मजुरांना पोहचविण्यासाठी यंत्रणा तोकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:15 PM2020-05-08T22:15:30+5:302020-05-08T22:15:49+5:30

कोरोनाची पार्श्वभूमी : मुंबई-पुण्याहून उत्तरप्रदेश, राजस्थानच्या दिशेने निघाले मजूर अक्षरश: पायी

Mechanism to deliver labor | मजुरांना पोहचविण्यासाठी यंत्रणा तोकडी

मजुरांना पोहचविण्यासाठी यंत्रणा तोकडी

Next

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन झाल्याने होणाऱ्या उपासमारीला कंटाळून मुंबई, पुणे येथून मजूर आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या दिशेने पायी निघाले आहे़ त्यांच्यासाठी निवास, भोजनाची सोय सोबतच वाहनाची व्यवस्था केली जात असलीतरी ती तोकडीच असल्याचे दिसून येत आहे़
मजुरांची पायपीट सुरुच
या मजुरांमध्ये मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि राजस्थानातील कुटूंबाचा सर्वाधिक समावेश आहे़ त्यामुळे धुळ्यातून जाणाºया मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून रात्रंदिवस मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे पायपीट करताना दिसत आहेत़ मिळेल त्या वाहनाने आणि शक्य होईल तिथपर्यंत मालवाहू वाहनांमधून त्यांचा प्रवास सुरू आहे़ वाहनाचा शेवटचा टप्पा आला की त्यांची पायपीट पुन्हा सुरू होते़ शिवाय काहींना वाहन मिळते तर काहींना मिळतही नाही़
मजुरांचा संयम सुटतोय
या मजुरांनी प्रशासनाच्या निवारा गृहांमध्ये यावे, रितसर पासेस घ्याव्यात अशी प्रशासनाशी अपेक्षा असली तरी या मजुरांचा संयम आता सुटला आहे़ कोरोना होईल, उष्माघात होईल किंवा अपघात होईल याची भिती आता त्यांना राहीली नसल्याचे चित्र आहे़ कोरोनाच्या आधी उपासमारीने मरण्यापेक्षा जोखीम पत्करुन प्रवास करीत घर गाठलेले बरे अशा त्यांच्या भावना झाल्या आहेत़ त्यामुळे त्यांनी तसा जीवघेणा प्रवास सुरू केला आहे़
मजुरांना थांबविण्याचा प्रयत्न
प्रशासनाच्या निदर्शनाला आल्यावर सुरूवातीला त्या त्या जिल्ह्यांमध्ये या स्थलांतरीत मजुरांना अडविले गेले़ धुळे जिल्ह्यात प्रामुख्याने गुजरात राज्यातून आणि मुंबई, पुणे या महानगरांमधून येणाºया मजुरांची संख्या सर्वाधिक होती़ कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी स्थलांतरीत मजुरांना अडवून त्यांची अन्न आणि निवाºयाची व्यवस्था करण्याची सूचना शासनाने आधीच दिली होती़ त्यानुसार धुळे जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली होती़ जिल्ह्यात चारही तालुक्यांमध्ये एक हजार नागरीक क्षमतेचे २२ कॅम्प तयार करण्यात आले़
२४ मार्च या तारखेला लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर एक एप्रिलपर्यंत ११८ स्थलांतरीत कामगारांची व्यवस्था प्रशासनान केली होती़ हा आकडा आता २०९ वर पोहोचला आहे़ या सर्वांना प्रशासनाने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली होती़ कॅम्पची जबाबदारी संबंधित तलाठी, सर्कलवर होती़ स्थलांतरीत मजुरांना विविध स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून दररोज चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली
घरी जाण्याचा आग्रह कायम
मे महिन्याच्या कडक रणरणत्या उन्हात स्थलांतरीत मजुरांचा महामार्गांवरुन जीवघेणा पायी प्रवास सुरू आहे़ या प्रवासात अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ पुरूषाच्या दोन्ही खांद्यावर मुले आणि महिलेच्या डोक्यावर सामान असा हा थक्क करणारा शेकडो किलोमीटरचा प्रवास आता थांबला आहे़ कितीही संकट आली तरी त्यांचा घरी जाण्याचा आग्रह कायम आहे़

Web Title: Mechanism to deliver labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे