ुधुळे महापालिकेच्या स्थायी समितीची सभा दोन मिनिटांत आटोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:06 PM2017-12-07T16:06:12+5:302017-12-07T16:07:38+5:30

नऊ विषय मंजूर, ८ सदस्यांची सभेला दांडी

The meeting of the Standing Committee of Municipal Corporation was completed in two minutes | ुधुळे महापालिकेच्या स्थायी समितीची सभा दोन मिनिटांत आटोपली

ुधुळे महापालिकेच्या स्थायी समितीची सभा दोन मिनिटांत आटोपली

googlenewsNext
ठळक मुद्देसभेत एकाही सदस्याने मत मांडले नाहीआठ नगरसेवकांनी दांडी मारलीसभेत ९ विषयांना मंजुरी देण्यात आली


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेत गुरूवारी स्थायी समितीच्या सभेने सलग दुसºयांदा औपचारिकतेचा कित्ता गिरवला़ अवघ्या दोन मिनिटांत विषयपत्रिकेवर असलेले विषय मंजूर करीत सभेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली़  विशेष म्हणजे केवळ दोन सदस्यांनी सभेची अधिकृत रजा घेतलेली असतांना तब्बल १० सदस्य सभेला अनुपस्थित होते़ 
महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीची सलग दुसरी औपचारिक सभा गुरूवारी पार पडली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य दिपक शेलार, कमलेश देवरे, नाना मोरे, मायादेवी परदेशी, वालिबेन मंडोरे हे सदस्य उपस्थित होते़  सभापती कैलास चौधरी यांचे ११ वाजून २३ मिनिटांनी सभागृहात आगमन झाले़ त्यानंतर वंदे मातरम् राष्ट्रवंदना झाली़ विषय वाचनास ११ वाजून २७ मिनिटांनी सुरूवात झाली तर ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत अर्थात अवघ्या दोन मिनिटात सर्व विषय मंजूर करण्यात आले़ नगरसचिव मनोज वाघ यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करताच सभापती कैलास चौधरी यांनी ‘मंजूर’ म्हणत लाखोंचे विषय मंजूर केले़ एकाही सदस्याने या सभेत मत प्रदर्शन केले नाही़ हजराबी महंमद शेख व जैबुन्नीसा अशरफ खाँ पठाण या दोन नगरसेविकांचे रजेचे अर्ज होते़ तर आठ नगरसेवकांनी सभेला दांडी मारली़ विद्युत विभागाने निर्गमित केलेले विविध कार्यादेश अवलोकनार्थ, उपायुक्त कवठळकर यांची रजा मान्यता, तापी जलवाहिनीला लागलेल्या गळत्यांच्या दुरूस्तीबाबत कार्याेत्तर मंजूरी व जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत गटार कामांच्या निविदांची दरमंजूरी असे एकूण ९ विषय सभेत मंजूर करण्यात आले़ 




 

Web Title: The meeting of the Standing Committee of Municipal Corporation was completed in two minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.