‘अक्कलपाडा’ धरण भरण्यासाठी बैठक होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:05 PM2019-05-27T22:05:54+5:302019-05-27T22:06:16+5:30

नियोजन : संबंधित मंत्री, अधिकारीही येणार

A meeting will be held to fill the 'Akkalpada' dam | ‘अक्कलपाडा’ धरण भरण्यासाठी बैठक होणार 

‘अक्कलपाडा’ धरण भरण्यासाठी बैठक होणार 

googlenewsNext

धुळे : अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. यंदाच्या दुष्काळात अक्कलपाडा धरणामुळे धुळे शहरासह धुळे, साक्री, शिंदखेडा व अमळनेर या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासह विहीर सिंचनासाठी मोठी मदत झाली आहे. त्यामुळे यंदा हे धरण १०० टक्के भरण्यासाठी मंत्रालयात जून महिन्यात मंत्रीस्तरावर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
या धरणातून नुकत्याच दिलेल्या दुसºया आवर्तनामुळे ऐन दुष्काळात १०० गावांसह जनावरांनाही फायदा झाला. या धरणात गेल्या सहा वर्षांपासून केवळ ६० टक्के जलसाठा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा धरणात १०० टक्के जलसाठा करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रा.शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात तातडीने ही बैठक घेण्यात येणार आहे. अक्कलपाडा मुख्य धरणाचे काम डिसेंबर २०१२ मध्ये पूर्ण झाले. धरणाखाली अतिरिक्त जमिनी बुडणार असल्याने धरणात गेल्या सहा वर्षांपासून अपेक्षित १०० टक्के जलसाठा निर्माण करता आलेला नाही. धरणावर ८०० कोटीपेक्षा जास्त खर्च होऊनही ६० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा होत नाही. त्यामुळे धरणाखालील शेतकरी वर्गात नाराजी पसरलेली आहे. डावा-उजवा कालवा, नदीजोड प्रकल्प व ब्रिटीशकालीन बंधाºयातून धरणाच्या पाण्याचा लाभ शेतकºयांना सिंचनासाठी मिळत नाही. 
नव्याने बाधित शेतीला नव्या भूसंपादन कायद्यानुसार जास्त मोबदला मिळणार असल्याने त्यासाठी संबंधित शेतकºयांनी तयारी दर्शविली. मात्र त्यासाठी भूसंपादनाची नोटीस देऊन त्यांच्या खात्यावर नवीन भूसंपादन कायद्यानुसार पैसे वर्ग करणे आवश्यक आहे. त्याशिवाय तांत्रिकदृष्ट्या धरणात १०० टक्के जलसाठा निर्माण करता येणार नाही. ही बाब प्रा.पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विजय शिवतारे, पालकमंत्री दादा भुसे, पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मंत्रालय स्तरावर व्यापक बैठक करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, सर्वेक्षणाअंती नव्याने २०० हेक्टर शेतजमीन बुडीताखाली जाणार असल्याचे लक्षात आले आहे़ 

Web Title: A meeting will be held to fill the 'Akkalpada' dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे