संदेश भूमीवर पार पडले भीमकाव्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:56 PM2020-08-01T21:56:39+5:302020-08-01T21:57:00+5:30

३१ जुलैच्या आठवणींना उजाळा । डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

The message crossed the earth | संदेश भूमीवर पार पडले भीमकाव्य संमेलन

dhule

Next

धुळे : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे शहराला भेट दिल्याच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती, अंकुर साहित्य संघ धुळे शाखा व लोककवी दिपक निकम काव्यधारा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रव्हल बंगला येथील संदेशभूमीवर भिमकाव्य संमेलन आयोजीत करण्यात आले होते़
संदेशभूमीवर बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अभिवादन करण्यात आले़ भिमकाव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक नामदेवराव शिरसाठ होते़ बाळापुर, फागणे, नरव्हाळ, गोंदुर, वाडीभोकर व धुळे महानगराच्या विविध भागातुन २० कवि-कवयत्रिंनी काव्यसंमेलनात सहभाग घेतला़
कविसंमेलनाची सुरुवात बुध्द वंदनेने करण्यात आली़ प्रास्तविक प्रा. राम जाधव यांनी केले़ शाहिर भास्कर आमृतसागर, कवि गुलाबराव धनजी मोरे, युवा कवयत्री मयुरी थोरात, कवि मोहन पवार, बालकवी राजरत्न पवार, शाहिर शंकरराव पवार, कवि रमेश सुर्यवंशी, शंकर सोनवणे, कवि दत्तात्रय कल्याणकर, कवि पानपाटिल, कवि प्रा. राम जाधव, नामदेव शिरसाठ आदींनी विविध भीमगितांच्या माध्यमातून काव्यसंमेलनात रंगत आणली़
शेवटच्या सत्रात संदेशभुमी कृती समिती अध्यक्ष आनंद सैंदाणे, उपाध्यक्ष बापु नेरकर यांच्या हस्ते सर्व उपस्थित कवि साहित्यकांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला़ संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. जाधव यांनी केले तर कवि कल्याणकर यांनी आभार मानले़
यावेळी हरिचंद्र लोंढेख श्रीराम तायडे, रवींद्र शिंदे, देविदास शिरसाठ, रवींद्र इंदवे, विशाल सोनवणे, विजय मोरे, दिपक नगराळे, राहुल वाघ, शरद वेंदे, दादा खंडारे, सुनील थोरात, अमित सोनवणे, सिध्दार्थ जाधव, मंगेश जाधव, कविश्वर गणेश उपस्थित होते़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जुलै १९३७ मध्ये धुळे शहराला भेट दिली होती़ धुळेकर जनतेने रेल्वे स्टेशनपासून ट्रॅव्हल्स बंगल्यापर्यंत (बस स्थानकाजवळील शासकीय विश्राम गृह) भव्य मिरवणूक काढली होती़ या घटनेला ८३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़

Web Title: The message crossed the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे