धुळे तालुक्यातील पिकांना गिरणेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:30 PM2020-04-18T21:30:52+5:302020-04-18T21:31:18+5:30
संडे अँकर । पाणी सोडण्याच्या आमदारांच्या सूचना, चांदे, मोरदड, खोरदड, शिरुड येथील शेतकऱ्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील चांदे, मोरदड, खोरदड, शिरुड व इतर गावातील लाभधारक शेतकऱ्यांना गिरणा पांझण डावा कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी गिरणा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाºयांना दिल्या़
मोरदड, खोरदड मायनर एक या नविन पाटचारीतून पहिल्यांदाच पाणी सोडणार असल्याने ऐन उन्हाळ्यात रब्बीच्या पिकांना जीवदान मिळणार आहे़
गिरणा डाव्या कालव्यातून धुळे तालुक्यातील शिरुड परिसरातील गावांना पाण्याचा लाभ दिला जातो़ परंतु चाळीसगाव तालुक्यातील गावांना जास्तीचे पाणी आवर्तन सोडले जात असल्याने धुळे तालुक्यातील शेतकरी वंचित राहतात़ हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार पाटील यांनी शेतकºयांसह गिरणा डावा कालवा अधिकाºयांची नुकतीच बैठक घेतली़ पाण्याअभावी पिके करपत आहेत़ आमच्या हक्काचे पाणी देखील आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची कैफीयत या बैठकीत शेतकºयांनी मांडली़ तसेच चांदे, तरवाडे, नाणे, सिताणे, मोरदड तांडा, खोरदड तांडा, शिरुड, मोरदड, खोरदड या गावांना पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी यावेळी शेतकºयांनी केली़
धुळे तालुक्यासाठी राखीव असलेले गिरणा प्रकल्पातील पाणी पुर्ण क्षमतेने सोडण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी अधिकाºयांना केल्या़ यावेळी बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, गिरणाचे उप अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस़ आऱ पाटील, आऱ आऱ वाघ, चांदे येथील शेतकरी रावसाहेब पाटील, अशोक पाटील, हरी पाटील, अधिकार पाटील, धर्मराज भवर आदी उपस्थित होते़
दरम्यान, ऐन उन्हाळ्यात पिकांसाठी गिरणा प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़
मोरदड मायनर पाटचारी कोरडीच
मोरदड, खोरदड मायनर पाटचारी क्रमांक एकचे काम गेल्या काही वर्षांपासुन पुर्ण झाले आहे़ परंतु या पाटचारीतून अजुनपर्यंत पाणी सोडलेले नव्हते़ या पाटचारीतुनही पाणी सोडण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या आहेत़ रोटेशन प्रमाणे प्रत्येक शेतकºयाचा पाण्यावर हक्क आहे़ कुणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी़ याआधी ज्या शेतकºयांच्या पिकांना पाणी मिळाले आहे त्यांनी इतर शेतकºयांच्य पिकांना पाणी मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी बैठकीत केले़