लाखो लिटर पाण्याची होते रोज नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:09 PM2019-02-19T22:09:29+5:302019-02-19T22:10:22+5:30

महापालिका : लोकमतच्या आवाहनानंतर धुळेकरांनी कळविल्या पाणी गळतीच्या समस्या

Millions of liters of water daily waste | लाखो लिटर पाण्याची होते रोज नासाडी

dhule

Next

धुळे : शहरात दररोज व्हॉल्व व जल वाहिनीच्या गळतीव्दारे लाखो लीटर पाण्याची अक्षरश: नासाडी होते़ शहरातील गळती रोखण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानंतर दररोज शहरातील विविध परिसरातील नागरिक व्हॉटसअपवर आपल्या भागातील गळतीचे फोटो पाठवित आहे.
धुळेकरांना तापी पाणी पुरवठा योजनेसह नकाणे आणि डेडरगाव तलावातून पाणी वितरीत केले जाते़ आजच्या स्थितीत बहुसंख्य भागात ३ ते ४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ त्याचे नियोजन पुरेशा प्रमाणात होत नसताना पाण्याची पाईप लाईन अथवा व्हॉल्व गळतीतून पाणी वाया जाते़ पाणी प्रश्नावर दरवर्षी मनपा गळती दुरूस्तीसाठी लाखो रुपये खर्च करीत असते. मात्र तरी देखील गळती रोखण्यास प्रशासनाला यश आले नाही़
शहरातील व्हॉल्वव्दारे होणारी गळती थांबविण्यासाठी प्रत्येक प्रभागानुसार सर्वेक्षण करून दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहेत तरच भविष्यातील पाणी प्रश्नावर मनपाला मात करता येवू शकते़
लाखो लीटरची नासाडी
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने जलवाहिनी फुटण्याचा प्रकार सतत घडतात़ प्रशासनाकडून दुरूस्ती केली जाते़ मात्र ती केवळ मोठ्या गळतीवर त्यामुळे आजही शहरातील बहुसंख्य व्हॉल्व, हातपंप, जलवाहिनीतून दुरूस्तीअभावी दररोज लाखो लीटर पाणी गटारीत वाहून जाते़
गळतीमुळे दुषित पाणी पुरवठा
भीमनगर, मच्छीबाजार, मोगलाई, आग्ररोड, देवपूर, वलवाडी, आदर्श कॉलनी अशा विविध भागात व्हॉल्व व जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत असते़ गळतीमुळे तयार होणाºया पाण्याच्या डबक्यातील दुषित पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहचत असते.
अभियानातून दुरूस्ती
नागरिकांच्या मुलभूत प्रश्न सुटावे, यासाठी शहरात राबविण्यात येत असलेल्या अभियानातून जलवाहिनी, व्हॉल्व गळती दुरूस्ती केली जात आहे़ तरीसुद्धा ज्याठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. त्याच प्रभागातील नागरिकांनी व्हॉटसअपद्वारे गळतीचे फोटो पाठविले आहे. म्हणून हे अभियान राबवितांना कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गळती दुरुस्ती करुन दररोज होणारी पाण्याची नासाडी त्वरित थााबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Millions of liters of water daily waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे