कर चुकविणाऱ्या ट्रकांवर लाखोंचा दंड लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 11:03 PM2020-01-07T23:03:47+5:302020-01-07T23:04:06+5:30
एलसीबी : तपासणीअंती बºयाच बाबी उघड
धुळे : जीएसटी न भरता परस्पर मध्यप्रदेश राज्यात जाणाºया दोन ट्रकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले़ या ट्रकमध्ये लोखंडी सळई भरलेली आहे़ कोणत्या प्रकारच्या पावत्या त्यांच्याकडे आढळून आलेल्या नाही़ त्यामुळे या दोन्ही ट्रक सांगवी पोलीस ठाण्यात जमा आहेत़
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारात पेट्रोलिंग करीत होते़ त्यावेळेस हॉटेल बालाजी समोर दोन ट्रक संशयास्पद रित्या उभ्या असल्याची माहिती त्यांना मिळाली़ त्यानुसार एमएच १८ एए ८८९२ आणि एमपी ०९ एचएच ८२७३ क्रमांकाचे ट्रक संशयास्पदरित्या थांबलेले होते़ त्याची तपासणी केली असता त्यात लोखंडाची सळई आढळून आली़ या मालाची बिल पावती नसल्याने पावती आणून ट्रक घेऊन जाण्याचे सांगण्यात आले़ परंतु पावती घेवून कोणीही आले नाही़ जीएसटी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ट्रकची माहिती ेघेतली असता ही दोन्ही वाहने जालना आणि दिंडोरी येथून माल भरुन निघाले होते़ परंतु ते कोणताही जीएसटी भरत नसल्याचे समोर आले़ जीएसटी अधिकारी कारवाई करत असून लाखोंचा दंड आकारला जाणार आहे़