मंत्र्यांच्या गावात आरोग्यसेवेचा बोजवारा
By admin | Published: April 8, 2017 04:26 PM2017-04-08T16:26:07+5:302017-04-08T16:26:07+5:30
रिक्त पदांमुळे येथे दाखल होणा:या रुग्णांवर होणा:या शस्त्रक्रिया व विविध सेवा प्रभावित झाल्या आहेत.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न बिकट : केवळ चार वैद्यकीय अधिका:यांवर मदार; मुख्य वैद्यकीय अधीक्षकासह दहा पदे रिक्त
दोंडाईचा, जि. धुळे, दि. 8- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या गावातील प्रशस्त व विविध सोयींनी युक्त अशा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकासह दहा पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे येथे दाखल होणा:या रुग्णांवर होणा:या शस्त्रक्रिया व विविध सेवा प्रभावित झाल्या आहेत.
हे उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. त्यात स्थापनेपासून 46 पदे मंजूर आहेत. यात सात वैद्यकीय अधिका:यांची पदे मंजूर असताना प्रत्यक्ष चारच पदे भरली गेली आहेत, त्यामुळे तीन पदे रिक्त आहेत. मुख्य वैद्यकीय अधीक्षक, परिचारिका दोन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, सहायक अधिसेविका, सहायक परिसेविका असे प्रत्येकी एक पद रिक्त आहे.
मागणी करूनही दुर्लक्ष
या उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक व नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडे करूनही अद्याप वैद्यकीय अधिका:यांची नेमणूक झालेली नाही.
केवळ एकच पद भरले
आरोग्य उपसंचालक एल. आर. घोडके यांनी 22 फेब्रुवारीला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली होती. तेव्हा इतर सुविधा व रिक्त पदे भरणार, असे आश्वासन दिले होते. परंतु, आजही दहा पदे रिक्त आहेत.
महिलांच्या समस्या सोडवण्यात अडचण
या उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अस्थिरोगतज्ज्ञ, दंतचिकित्सक नाही. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, महिलांना तपासणीसाठी धुळे शहरात जाण्याचा सल्ला दिला जातो.
पोलीस संरक्षण देण्याची गरज!
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात परिचारिकेला धमकावण्याची घटना ताजी असताना व शासनाने पोलीस संरक्षण देण्याची घोषणा करूनही अद्याप उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचा:यांना पोलीस संरक्षण मिळालेले नाही. पोलीस संरक्षणाची मागणी येथील कर्मचा:यांनी केली आहे. रुग्णालयात गावगुंड व दारुडय़ांचा त्रास वाढल्याची तक्रार आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करावी, बालरोग, स्त्रीरोग, अस्थितज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आदींसह तीन वैद्यकीय अधिका:यांचीही नेमणूक करावी. काही दिवसांपूर्वी येथे कार्यरत परिचारिकेला मद्यपींनी दमबाजी करून रुग्णालयात धिंगाणा घातला, त्यामुळे येथे पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वरिष्ठांकडे रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व इतर कर्मचारी नेमणुकीची मागणी केली आहे. पोलीस बंदोबस्त मागितला आहे, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- डॉ.ललित चंद्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय