लगचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

By Admin | Published: January 24, 2017 12:49 AM2017-01-24T00:49:04+5:302017-01-24T00:49:04+5:30

धुळ्यातील अजबेनगरातील घटना : एकाविरुद्ध गुन्हा दाखल

A minor boy escaped with bait | लगचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

लगचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविले

googlenewsNext

धुळे : लगAाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आह़े याप्रकरणी एकाविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहरातील अजबेनगरात राहणा:या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील किशोर सुरेश साळुंखे (रा़ नवजीनवन ब्लड बँकेजवळ, धुळे) याने लगAाचे आमिष दाखवून फुस लावून घराजवळून अज्ञात ठिकाणी पळवून नेल़े ही घटना 22 जानेवारी रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किशोर साळुंखेविरुध्द भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक बी़ डी़ पाटील करत आहेत़
एक लाखासाठी
विवाहितेचा छळ
माहेरून एक लाख रुपये आणावे व पतीचे अनैतिक संबंध उघड करून नये, या कारणावरून दीपाली राहुल सरदार (वय 20) या विवाहितेचा सासरी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला़ तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली़ हा प्रकार 20 एप्रिल 2014 चे दोन महिन्यानंतर सुरू झाला़ याप्रकरणी दीपाली सरदार हिने रविवारी सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती राहुल दिगंबर सरदार, सासरे दिगंबर शामराव सरदार, सासू भारती दिगंबर सरदार, जेठ संदीप दिगंबर सरदार, जेठाणी मनीषा संदीप सरदार, दीर भरत दिगंबर सरदार, चुलत सासरे हेमराज श्यामराव सरदार, चुलत सासू वंदना हेमराज सरदार सर्व (रा़ कनाशी, ता भडगाव जि़ जळगाव) यांच्याविरुध्द भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
चारित्र्यांच्या संशावरून
 विवाहितेचा छळ
इलेक्ट्रीक दुकान टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावे व चारित्र्याचा संशय घेऊन मनीषा हरीशचंद्र चौधरी (वय 28, रा़ कमला नगर, भोपाळ व ह़मु त्रिमूर्तीनगर, वाडीभोकर रोड, वलवाडी, धुळे)  या विवाहितेचा सासरी मानसिक छळ करण्यात आला़ तिला हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ हा प्रकार 15 एप्रिल 2006 रोजी लगA झाल्यानंतर ते 24 ऑगस्ट 2016 दरम्यान घडला, अशी फिर्याद मनीषा चौधरी हिने रविवारी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार पती हरीशचंद्र भगवान चौधरी, सासू इंदूबाई भगवान चौधरी, जेठ संजय भगवान चौधरी, दीर विजय भगवान चौधरी सर्व (रा़ कमलानगर, भोपाळ, मध्य प्रदेश) व नणंद लता मधुकर चौधरी (रा़ गल्ली नं़ 5, धुळे), शांताबाई चौधरी (रा़ बागवान गल्ली, नंदुरबार), शीतल जगदीश चौधरी (रा़ मालपूर रोड, दोंडाईचा) यांच्याविरुध्द भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एम़ पी़ पाटील करत आहेत़
स्टोव्हच्या भडक्यात
भाजल्याने महिलेचा मृत्यू
स्टोव्हचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आह़े सुरेखाबाई राजेंद्र निकम (वय 45, रा़ डांगशिरवाडे, ता़ साक्री) असे मयत महिलेचे नाव आह़े त्या 6 जानेवारी रोजी सकाळी 10़45 वाजेच्या सुमारास राहत्या घरी स्टोव्हचा भडक्यात 51 टक्के भाजल्या होत्या़ त्यांना ¨पंपळनेर ग्रामीण  रुग्णालयातून जिल्हा सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार सुरू असतांना त्यांचा           13 जानेवारी रोजी पहाटे मृत्यू          झाला़ याबाबत राजेंद्र निकम यांनी पिंपळनरे पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पो़ह़े कॉ परदेशी करत आहेत़

Web Title: A minor boy escaped with bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.