पारोळ्याच्या तरुणाची धुळ्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:12 PM2018-09-20T13:12:42+5:302018-09-20T13:26:43+5:30
अपघात : बसखाली चिरडला गेला, अकस्मात नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पारोळा येथील तरुणाने बसस्थानकात परिसरात बसच्या मागील चाकात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, तरुणाने आत्महत्या कशासाठी केली हे मात्र समजू शकलेले नाही़
एमएच २० डीएल ०१०५ क्रमांकाची भुसावळकडून साक्रीकडे जाणारी बस धुळे शहरातील बसस्थानकातील ज्या मार्गाने बस आगाराच्या बाहेर निघते त्या मार्गावरील कोपºयावरच ही दुर्घटना घडली़ पारोळा येथील भूषण कैलास शिंपी (२८) हा तरुण उभा होता़ बस ही आगाराच्या बाहेर निघत असतानाच अचानक या तरुणाने बस खाली येऊन आपले जीवन संपविले़ बसचे चाक या तरुणाच्या पोटावरुन गेल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला़ घटना लक्षात येताच आरडा-ओरड झाल्याने बस जागेवरच थांबविण्यात आली़ गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लागलीच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यातच त्याचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते़