आमदार गोटे यांचे पुन्हा एकदा बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:28 AM2019-03-20T11:28:58+5:302019-03-20T11:29:15+5:30

घोषणा : धुळे लोकसभा मतदार संघातून अपक्ष लढणार

MLA Gote again rebelled | आमदार गोटे यांचे पुन्हा एकदा बंड

आमदार गोटे यांचे पुन्हा एकदा बंड

Next



धुळे : शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा बंडाचा पवित्रा घेतला असून आपण लोकसभा निवडणूक धुळे लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे.
शहर महापालिका निवडणुकीत त्यांनी अन्य पक्षातून आयात केलेल्या तसेच गुन्हेगार असलेल्या उमेदवारांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच स्वतंत्रपणे उमेदवार उभे करून निवडणूकही लढविली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा केवळ एक उमेदवार विजयी झाला होता.
लोकसभा निवडणूक लढविणार असून अपक्ष उमेदवारी करू. त्यासाठी आमदार पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही.
-अनिल गोटे, आमदार,
धुळे शहर विधानसभा मतदारसंघ

Web Title: MLA Gote again rebelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.