आमदार मंगेश चव्हाण कोरोना पाझिटीव्ह, संपर्कातील व्यक्तींना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:15 PM2020-08-22T15:15:27+5:302020-08-22T15:16:06+5:30
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता चाचणी केल्यानंतर माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे.
धुळे : चाळीसगाव / पाचोरा : खान्देशातील सर्वात तरुण आमदार ठरलेले मंगेश रमेश चव्हाण हे आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी शनिवारी कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. तसेच पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून या दोघांनी आपल्या संर्पकात आलेल्या प्रत्येकाने कोविड चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता चाचणी केल्यानंतर माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी व सर्वांनी आपापली काळजी घ्यावी ही विनंती, आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद सोबत आहेत, काळजीचे कारण नाही, अशी फेसबुक पोस्ट आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. आत्तापर्यंत अनेक आमदार व नेते मंडळींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, उपचारानंतर हे सर्वजण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, काळजी घेण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात शुक्रवारी १४ हजार १६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० इतकी झाली आहे. मात्र, दिवसभरात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४ लाख ७० हजार ८७३ वर पोहचली आहे. सध्या राज्यभरात १ लाख ६४ हजार ५६२ अँक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.