मनसेने केले महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:52 AM2020-09-29T11:52:15+5:302020-09-29T11:52:37+5:30

राष्टÑीय महामार्गावरील पळासनेर ते धुळे दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडले खड्डे, टोल प्रशासनाला दिले निवेदन

MNS planted trees in the ditch on the highway | मनसेने केले महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण

मनसेने केले महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण

Next

आॅनलाइन लोकमत
नरडाणा (जि.धुळे) :पळासनेर ते धुळेपर्यंत असलेल्या राष्टÑीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे असून, पायाभूत सुविधा तसेच दिशादर्शक चिन्ह या संबंधित समस्या निवारण करण्यासाठी मनसेकडून महामार्गावरील खड्डयात वृक्षारोपण करून त्याला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सोनगीर येथील टोल प्रशासनाला निवेदन देवून सात दिवसाच्या आत रस्ता दुरूस्त करण्याचा इशारा देण्यात आला.
राष्टÑीय महामार्गावर असलेल्या शिरपूर -धुळे दरम्यानच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. अपघातामुळे जीवीतहानी होत असून देखील टोल कंपनी या या गोष्टींवर दुर्लक्ष का करत आह.तसेच या खड्ड्यांमुळे जर अपघात होत असतील याला सर्वस्वी जबाबदार टोल कंपनीला गृहीत धरून व्यवस्थापनावर ३०२चे गुन्हे दाखल करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभारेल.जर कंपनी टोल वसुली करीत आहे. तर वाहनधारकांना दर्जेदार रस्ता देण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे.नियमानुसार रस्ते खड्डेमुक्त असणे गरजेचे आहे, तरच टोल वसुली केली जाईल असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
जर येत्या सात दिवसाच्या आत जर टोल सदरील खड्डे बुजत नसेल तर मनसे सैनिकांकडून ते खड्डे बुजले जातील व टोलला सदर फलक लावले जाईल की ‘रोडवरील खड्डे मनसे कडून बुजविल्यामुळे कोणीही टोल चे पैसे देऊ नयेत’. दरम्यान रस्त्यावर खड्डे असल्याच्या निषेधार्त मनसेतर्फे बाभळे फाटयाजवळ महामार्गावर खड्डयात वृक्षारोपण करण्यात आले.
सोनगीर येथे टोल प्रशासनाला निवेदन देतांना मनसेचे तालुकाध्यक्ष बबनराव पाटील, रामकृष्ण पाटील , समाधान पाटील, माधव सिसोदे, नरेश शिसोदे, बाळा पवार, कमलेश शिसोदे, दीपक पाटील, हाबित पहलवान, भटू पाटील, कांतीलाल कोळी, निखिल शिंदे, शाहरुख मिस्तरी ,ओम सिसोदे ,सद्दामला हलवाई, लाला पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MNS planted trees in the ditch on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे