मोदी की नोट आणि सैराटसह ‘दंगल’
By admin | Published: January 5, 2017 11:01 PM2017-01-05T23:01:45+5:302017-01-05T23:01:45+5:30
नायलॉन आणि चायना दो:याचीही सर्रास विक्री : पतंगोत्सवाची आतापासूनच सुरू झाली धूम
नंदुरबार : मकरसंक्रांतीनिमित्त साज:या होणा:या पतंगोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहराच्या आकाशात सकाळी व सायंकाळी शेकडो रंगीबेरंगी पतंग उडताना दिसत आहेत. पतंग उडविण्यासाठी लागणारा दोरा अर्थात मांजा नायलॉनपासून तयार करण्यास बंदी घालण्यात आलेली असतानाही त्याची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यंदा पतंगांमध्ये ‘मोदी की नोट’ची जादू असून ‘सैराट’ व ‘दंगल’ धूम करीत आहेत.
मकरसंक्रांतीला नंदुरबारात मोठय़ा प्रमाणावर पतंगोत्सव साजरा केला जातो. त्यासाठीची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते. यंदादेखील गेल्या 15 दिवसांपासून पतंग उडविण्यास सुरुवात झाली आहे. यंदा विविध आकार व प्रकारातील पतंग बाजारात दाखल झालेले आहेत. दोरा अर्थात मांज्याचेदेखील विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.
चौकाचौकात दुकाने सजली
शहरातील चौकाचौकात पतंग व मांजा विक्रीची दुकाने सजली आहेत. अगदी दोन रुपयांपासून दीडशे रुपयांर्पयतचे आकर्षक पतंग उपलब्ध झाले आहेत. येत्या आठ दिवसात पतंग विक्रीच्या दुकानांमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यातून लाखोंची उलाढाल शक्य आहे. यंदा शनिवार व रविवार असे दोन दिवस पतंगोत्सवासाठी मिळणार असल्यामुळे तरुणाईमध्ये उत्साह आहे.
दरवर्षी पतंग-दोरा व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी साधारणत: 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबारला मंगळबाजारासह अमर, अमृत सिनेमागृह परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, स्टेशन रोड, गणपती मंदिर या भागात पतंगांची दुकाने थाटली जातात. यावर्षी चायना मेडपासून निर्मित पतंग, दोरा, चक्रीला विशेष मागणी आहे. काच, सरस, रंग आणि इतर साहित्याद्वारे रिल बनविला जातो. यंदा 24 कॅरेट, आरडीएक्स, बाजीगर, गेंडा, बियर, चॅलेंज, अगAी, ग्रिफीन, एसपीथर्ड, मोनोकाईड, एस. पॉवर, आयबीके गोल्ड प्रकारातील दोरा बाजारात उपलब्ध आहे. 80 ते 500 रुपयांर्पयत आणि 500 ते एक हजारावर या प्रमाणात दोरा मिळतो. याशिवाय चक्रीमध्ये स्टील, प्लॅस्टिक, लाकडी प्रकार आहेत. तसेच लहान मुलांचे आकर्षक ठरलेले चार बाय चार इंचाचे छोटा भीमचे पतंग अवघ्या दोन रुपयात मिळत आहेत. यामुळे बच्चे कंपनी जाम खूष आहे. पतंग उडवताना दुखापत झाल्यास हाताला, बोटाला, चिटकविण्याची पट्टी, रबरी सुरक्षा कव्हर, ग्लोव्हज्, हातमोजे विविध प्रकारात बाजारात विक्रीस आले आहेत. याशिवाय नवीन वर्ष 2017 च्या स्वागताचे विविध रंगीबेरंगी पतंग बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत.