मोहरम शांततेत साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 09:27 PM2020-08-30T21:27:28+5:302020-08-30T21:27:50+5:30
मिरवणुका नाही : जागेवरच ताजिया पूजन
धुळे : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारल्याने शहरासह जिल्ह्यात मोहरम सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला़
शहरात मोहरम निमित्त सुमारे दीडशे ते दोनशे सवाऱ्या आणि मिरवणुका असतात़ सुभाष चौक किरण सायकल मार्ट येथे गेले सात ते आठ वर्षांपासून श्रीरंग पेंटर राजेंद्र सोनवणे हे सवारी उत्सवाचे आयोजन करीत आहेत़ कोरोनाच्या वाढत्या प्रभावमुळे यंदा मोहरम सण देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला़ वाजंत्रीसाठी प्रशासनातर्फे परवानगी नाकारण्यात आली होती़ शनिवारी कत्तल ची रात्र होती़ रविवारी साध्या पध्दतीने मोहरम सण साजरा झाल्यानंतर सर्वत्र शांतता झाली आहे़
देवपुरातील अन्दरवाली मशिद येथे अनेक वर्षांपासुन ताजीया बनवला जातो़ यंदा शासनाची मंजुरी न मिळाल्याने घरीच ताजीया ठेवणात आला आहे. या ताजियाला मानाचे स्थान आहे़ शहरातील साक्री रोडवर देखील मोहरम मिरवणुकांचा उत्साह मोठा असतो़ परंतु यंदा सवाºया आणि मिरवणुका निघाल्या नसल्याने शांतता होती़