पारंपरिक नृत्याविष्कारांची रसिकांवर मोहिनी
By admin | Published: January 6, 2017 07:55 PM2017-01-06T19:55:09+5:302017-01-06T19:55:09+5:30
एका पेक्षा एक सादर होत असलेले नृत्याविष्काराला मिळालेली दाद. त्यातून निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणात येथे उत्तरोत्तर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाईने पारंपरिक
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 6 - एका पेक्षा एक सादर होत असलेले नृत्याविष्काराला मिळालेली दाद. त्यातून निर्माण झालेल्या चैतन्यमय वातावरणात येथे उत्तरोत्तर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तरुणाईने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत या नृत्याविष्काराची रसिकांवर मोहिनी टाकली.
निमित्त होते, स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे सरकारसाहेब रावल यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘जय लोकोत्सव’ या कार्यक्रमाचे. दरम्यान, यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिंदखेडा तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी हा कार्यक्रम दादासाहेब रावल नॉलेज सिटीत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नयनकुवर रावल होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख, सी. एन. राजपूत, के. एम. अग्रवाल, ईश्वर भावसार, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील,
आर. टी. गिरासे, दोंडाईचा पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, कार्यक्रम संयोजक प्राचार्य एन. ओ. गिरासे, उपप्राचार्य के. डी. गिरासे, सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. पाटील, डी. एन. जाधव, एस. बी. गिरासे, बी. एस. रावल उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. राजपूत यांनी केले. परीक्षक म्हणून परीक्षक म्हणून सिद्धार्थ बागुल, किशोर शिरसाठ, सागर आठवलं, सोमनाथ शिंपी यांनी केले.
१२८ स्पर्धकांनी घेतला सहभाग
शिंदखेडा तालुका व दोंडाईचा शहरातील विविध शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील १२८ स्पर्धकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दादासाहेब रावल महाविद्यालयातील पूजा गिरासे या विद्यार्थिनीने ‘सत्यम शिवम सुंदरा’हे गीत सादर करून वातावरणात रंगत आणली. यानंतर विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, जोगवा, भांगडा, लावणी, देशभक्तीपगर गीने, अहिराणी गीतांवर ठेका धरत येथे आयोजित कार्यक्रम उत्तरोत्तर रंगविला.
नाटिकेतून दिला स्त्री-भ्रूणहत्त्या रोखण्याचा संदेश
दोंडाईचा शहरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘नन्निशी चिडीया’ या विषयावर नाटीका सदार करून स्त्री-भ्रूणहत्त्या रोखण्याचा संदेश दिला.