द्राक्ष बागायतदारांचे अडकलेले पैसे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:49 AM2019-01-14T11:49:44+5:302019-01-14T11:50:32+5:30
सटाणा : केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांना यश
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सटाणा परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे तब्बल ६ कोटी रूपये दिल्लीतील व्यापाºयाकडे अडकले होते. ते मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. अखेर केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची भेट घेऊन त्यांनी साकडे घातले. त्यानुसार डॉ.भामरे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले व शेतकºयांना त्यांचे पैसे नुकतेच परत मिळाले.
सटाणा परिसरातील ९० द्राक्ष बागायतदारांचे दिल्ली येथील रोहितकुमार अॅड. जतीन कुमार या व्यापाºयाकडे द्राक्षांचे रुपये ६ कोटी घेणे होते. बरेच प्रयत्न करूनही हा व्यापारी त्यांचे पैसे देत नव्हता. आर्थिक संकटात असलेल्या शेतकºयांची या फसवणुकीमुळे अतिशय दयनीय परिस्थिती झाली होती. ह्या सर्व ९० द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्याकडे मांडली. डॉ. भामरे यांनी नाशिक पोलीस महासंचालक दिघावकर व नाशिकचे पोलीस अधीक्षक दराडे यांच्या सहकार्याने दिल्ली येथील व्यापाºयाकडे हे अडकलेले पैसे वसूल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून सर्व ९० द्राक्ष बागायतदारांना त्यांचे अडकलेले ६ कोटी रूपये नुकतेच परत मिळाले आहेत.
त्या निमित्त या द्राक्ष बागायतदारांचे प्रतिनिधी खंडेराव शेवाळे, बापू महादू खैरनार, दगा नारायण वाघ, जिभाऊ कापडणीस. अरुण गुरुजी वाघ, तुषार कापडणीस, राजू मांडोळे, युवराज कापडणीस, अभिमान जाधव इ. यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांना द्राक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी मंत्री डॉ़ भामरे यांनी शेतकºयांशी हितगुज देखील साधण्याचा प्रयत्न केला़