मुकटीच्या बॅँकेत पैसे मिळेना़़़!
By admin | Published: January 20, 2017 11:58 PM2017-01-20T23:58:15+5:302017-01-20T23:58:15+5:30
मुकटी येथे सेंट्रल बॅँकेच्या शाखेत पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत असून बॅँकेपुढे गर्दी असल्याचे चित्र कायम आहे.
धुळे : तालुक्यातील मुकटी येथे सेंट्रल बॅँकेच्या शाखेत पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत असून बॅँकेपुढे गर्दी असल्याचे चित्र कायम आहे. शुक्रवारी शेतक:यांनी शाखाधिका:यांची भेट घेऊन कैफियतही मांडली.
मुकटी येथील सेंट्रल बॅँक शाखेला परिसरातील 13 गावे जोडलेली असून सुमारे 35 हजार खातेदार आहेत. पैसे मिळत नसल्याने शेतकरी व मजुरांचे हाल होत आहे. या संदर्भात बॅँकेच्या वरिष्ठांशी बोलून मार्ग काढा, अशी मागणी शेतक:यांनी बॅँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील डुंगडुंग यांच्याकडे केली. युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी ही भेट झाली. बॅँक कर्मचा:यांकडून परिचितांना अन्य ग्राहकांपेक्षा जास्त पैसे दिले जातात. काहींना चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळालेले नाही. शेतकरी, मजुरांचे जास्त हाल आहेत. निराधार योजनेचे वृद्ध लाभार्थी, पेन्शन व पगारधारकांनाही पुरेसे पैसे मिळत नाही, असा पाढा यावेळी वाचण्यात आला. यावर शाखा व्यवस्थापक डुंगडुंग म्हणाले की, तसे काही नाही. बॅँकेला एक दिवसाआड 10-15 लाख मिळतात. सर्वाना काही ना काही गरज असल्याने रांगेतील सर्वाना पैसे मिळावेत, असा आमचा प्रय} असतो. लवकरात लवकर पुरेसे पैसे कसे उपलब्ध होतील हे पाहू, असे आश्वासन शेतक:यांना देण्यात आले. बॅँकेला शुक्रवारी नेहमीपेक्षा जास्त म्हणजे 25 लाख रुपये मिळाले असून प्रत्येक ग्राहकाला पैसे वाटप करण्याचा प्रय} केला जाईल, असे व्यवस्थापक डुंगडुंग यांनी संध्याकाळी दूरध्वनीवरून संपर्क साधला तेव्हा सांगितले.
मर्यादेएवढे कमाल पैसे दिल्यास पहिल्या 20-22 ग्राहकांनाच पैसे पुरतील. त्यामुळे उपलब्ध पैसे रांगेत उभ्या सर्वाना मिळावे, या दृष्टीने वाटप केले जाते. मुकटी येथे सतत पैसे वाटप होऊनही गर्दी कायम असते. ग्राहक रांगेत उभे राहण्यासही प्रसंगी तयार नसतात. त्यामुळे कर्मचारी हतबल ठरतात.
- प्रदीप गिलाणकर,
अग्रणी बॅँक व्यवस्थापक
पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल
पिंपळनेर : नोटाबंदीचा काळ उलटून गेल्यानंतरही शेतक:यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळत नसल्यामुळे माळमाथा परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. नोटाबंदीच्या काळात मोठय़ा कष्टाने जमवलेले पैसे बॅँकेत ठेवले. परंतु, शेतक:यांना त्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे रब्बीचे कामे खोळंबली आह़े रब्बी हंगामांतर्गत ऐन मशागतीच्या काळात कापूस, मका, ज्वारी विकून हाती पैसे देण्याऐवजी व्यापा:यांनी शेतक:यांना चेक दिला. परंतु, शेतक:यांनी चेक जमा करूनही पैसे काढण्यासाठी शेतक:यांना रांगेत उभे राहून पैशाची प्रतीक्षा आहे. परंतु, ‘कॅश शिल्लक’ नसल्यामुळे शेतक:यांची अडचण झाली आहे.