आईने दिव्यांग शाळेला दिला डिजीटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:23 PM2019-03-17T23:23:00+5:302019-03-17T23:23:16+5:30

मुलाच्या स्मरणार्थ उपक्रम : धार्मिक विधीचा खर्च टाळून अनोखा संदेश

Mother gave digital school to Divyang School | आईने दिव्यांग शाळेला दिला डिजीटल वर्ग

dhule

Next

कापडणे : एकुलत्या एक मुलाचे अचानक निधन झाले. त्या दु:खातून सावरत किरण चंद्रशेखर शर्मा यांनी मुलाच्या स्मरणार्थ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चातून डिजिटल वर्ग तयार करून दिला. मृत्यूनंतर धार्मिक विधीवर मोठा खर्च केला जातो. परंतू या परंपरेला फाटा देत शर्मा कुटुंबियांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
स्वप्नील चंद्रशेखर शर्मा (३५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या एकुलत्या एक मुलाचे अचानक निधन झाल्याने शर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. परंतू या दु:खातून सावरत स्वप्नीलच्या आई किरण शर्मा यांनी नवजीवन विद्या विकास मंडळ संचलीत नगाव दिव्यांग निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक व प्रभावी शिक्षण मिळावे, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून स्वखचार्तून डिजिटल वर्ग तयार करुन दिला. या वर्गाचे लोकार्पण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना यापुढे संपूर्ण अभ्यासक्रम डिजिटल वगार्तून मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष शशीकांत भदाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव स्वप्नील भदाणे, किरण शर्मा, सोनल पंचारीया, शोभा शर्मा, विजया पंचारीया, ज्योती शर्मा, अतुल पंचारीया, उर्वशी शर्मा, संगीता शर्मा, शितल शर्मा, अनिता तिवारी, सुनिता जोशी, सुहित शर्मा, संकेत शर्मा, शितल भदाणे, केंद्रसचालक राजेंद्र नेरकर, शिवाजी जाधव, भारती सोनवणे, आशा शिंदे, आशा भामरे, कमलेश देसले, अमोल अवारे, नंदकिशोर निकम आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र नेरकर यांनी केले.

Web Title: Mother gave digital school to Divyang School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे