धुळ्यात शिवसेनेचे जलआंदोलन सुरुच
By admin | Published: June 8, 2017 01:30 PM2017-06-08T13:30:45+5:302017-06-08T13:30:45+5:30
रात्रभर पाण्यात उभे : आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.8 - शेतकरी व शिवसेना पदाधिकारीचे बुधवारी सकाळी 11 वाजे पासून साहुर ता. शिंदखेडा येथे अखंडित रात्रभर पाण्यात उभे राहुन जल आंदोलन सुरू असताना या आंदोलकांजवळ एकही प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नाही. बंदोबस्तासाठी केवळ 2 पोलीस उपस्थित आहेत . बुधवारी दुपारी नायबतहसीलदार यांनी भेट दिली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असताना आंदोलकांनी त्याना सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो र्पयत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही व नायबतहसीलदार हे निघून गेले. आंदोलकांनी रात्रभर पाण्यात उभे राहून जल आंदोलन सुरुच ठेवले.
आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पं. स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, राजू रगडे , मयूर निकम, राकेश राजपूत, गणेश भदाणे, किरण सावळे , गंगाराम शिरसाठ, कैलास ठाकूर, राकेश सोनवणे, रमेश कोळी, योगेश सोनवणे, शानाभाऊ शिरसाठ, बाळू कोळी, कैलास कोळीयांनी सहभाग घेतला आहे.