सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:37 PM2019-09-26T22:37:52+5:302019-09-26T22:38:22+5:30

भील परिवारावर काळाचा घाला : पुरमेपाडा ता.धुळे येथे वीज कोसळून घडलेली दुर्देवी घटना  

Moving along, the sisters retired | सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्या

सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्या

googlenewsNext

धुळे : तालुक्यातील पुरमेपाडा शिवारातील चुडामण नगरात राहणाºया दोन चुलत बहिणी़ घरातील कामांमध्ये सहभाग नोंदविणे, कुठेही जायचे असेल तर सोबत फिरणे़ असे सुरळीत सुरु असताना अचानक वीज कोसळून तिघे जखमी झाल्या़ यात ज्या गंभीर जखमी झाल्या त्यांचा उपचार घेताना मृत्यू ओढवला़ सोबत फिरणाºया बहिणी सोबतच निवर्तल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़ 
धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथील चुडामण नगरात भील परिवार वास्तव्यास आहे़ कैलास रामसिंग सोनवणे (भील) यांची पत्नी व त्यांना दोन मुली आहेत़ त्यांना कौशल्या नावाची १६ वर्षाची मोठी मुलगी आहे़ तसेच त्यांचा चुलत भाऊ देवा अर्जुन सोनवणे (भील) हे त्यांची पत्नी व १५ वर्षाची मुलगी छाया असे सोबत राहतात़ तसेच त्यांचा चुलत भाऊ खंडू अर्जुन सोनवणे (भील) हे त्यांची पत्नी व १६ वर्षाची मुलगी सविता असे सोबत राहतात़ हे सर्व जण मजुरीचे काम करुन आपआपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात़ 
गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या बोरी नदीच्या जवळ कौशल्या कैलास सोनवणे, छाया देवा सोनवणे, सविता खंडू सोनवणे हे नेहमीप्रमाणे बोरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ पावसाळी वातावरण होते़ बारीक पावसाची संततधार सुरु होती़ वीज कोसळेल असे काही चिन्हे नव्हती़ असे असलेतरी अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला, पाऊस येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि अचानक वीज कोसळली़ पाऊस आल्याने या तिघी आपले कपडे धुण्याचे काम आटोपून घराकडे परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली़ यात त्या तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुध्दच पडल्या़ त्या बेशुध्द पडल्याचे गावातील समाधान परशुराम सोनवणे यांनी पाहीले़ या तिघींना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालायात उपचारासाठी दाखल केले आणि सविता हिला आर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ 
वैद्यकीय उपचार सुरु असताना कौशल्या सोनवणे आणि छाया सोनवणे या दोघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ शिवम पावरा यांनी गुरुवारी दुपारी  झाल्याचे घोषीत केले़ तर जखमी  सविता सोनवणे हिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु   आहेत़ 
बोरी नदीच्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला
विंचूर - तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी शरद नथू पाटील (४१)  रा.धामणगाव हे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धामणगाव शिवारातून धामणगाव ते खोरदड रस्त्याने शेतातून घरी येत असतांना बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली. रात्री उशिरापर्यंत  शरद पाटील यांचा मृतदेह मिळून आलेला नाही.  दरम्यान ,बोरीनदीवरच पुढे पारोळा जि.जळगाव येथे तामसवाडी धरण आहे. सन २०१७- १८ साली  देखील अचानकपणे रात्री नदीला पूर आल्याने  जनावरांची मोठया प्रमाणात जिवीत हानी झाली होती. याठिकाणी वारंवार पुलाची मागणी करुन देखील ती पूर्ण झालेली नाही.

Web Title: Moving along, the sisters retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे