मनपा देणार मुलींसाठी शिष्यवृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:42 PM2019-09-13T22:42:56+5:302019-09-13T22:43:15+5:30
सभेत निर्णय : आरोग्य, स्वच्छतागृह, महिलासाठी प्रशिक्षणाला मंजूरी
धुळे : महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या १ हजार ४०० गुणवत्ताधारक मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला़
मनपाच्या स्व. दिलीपजी पायगुडे समिती सभागृहात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता महिला व बाल कल्याण समितीची बैठक घेण्यात आली़ यावेळी सभापती निशा पाटील, उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाठ, सहाय्यक उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ व सदस्या उपस्थित होत्या़
महिला व मुलींसाठी शाळा महाविद्यालय, हॉस्टेल अशा ठिकाणी सॅनेटरी नॅपकिंग वेंडीग मशिन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार मनपाच्या सात आरोग्य केंद्रांमध्ये सॅनटरी नॅपकीन मशीन बसविण्यात यावे़ त्यासाठी एकूण २ लाख ७६ हजार ७१० रूपयांचा खर्च अपेक्षित आहे़ अशी माहिती सभेत आरोग्य अधिकारी डॉ़ पवार यांनी दिली़
महिला प्रशिक्षण खर्चास मंजूरी
महिला व मुलींसाठी एमएससीआयटी तसेच फॅशन डिझाईनिंग दोन विषय मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आले होते़
प्रशिक्षण देण्यासाठी गुरूदत्त तांत्रिक शिक्षण संस्थेंशी करार करण्यात आला आहे़ त्यासाठी प्रति लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ८०० रुपये खर्च येणार असल्याची माहिती देण्यात आली़ सभेत एकूण तीन विषयांना मंजूरी देण्यात आली़