मनपा कोविड सेंटर अचानक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:36 PM2020-08-01T13:36:28+5:302020-08-01T13:37:18+5:30
दुर्लक्ष : जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाईची केली मागणी
धुळे : शहरातील मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जबाबदार अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे़ त्यामुळे होम क्वारंटाईन केलेल्या रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे़ संबधित आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी मनपा आयुक्तांकडे उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केली आहे़
महानगरात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे़ सध्यास्थिती --- रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे़ तर-- रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे़ संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मनपाकडून शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालय अधिग्रहित करण्यात आले आहे़ त्याठिकाणी शहरातील कोरोना बधित रूग्णांची व्यवस्था केली आहे़ मात्र संमधित रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रार उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार गुरूवारी सायंकाळी उपमहापौर अंपळकर यांनी अचाकन शहरातील मनपाच्या तंत्रनिकेत महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये पाहणी केली़ यावेळी होम क्वारंटाईन केलेले रूग्ण परिसरात बिनधास्त फिरतांना आढळून आले़ तर रूग्णांवर देखरेखीसाठी मनपाचा संक्षम अधिकारी सेंटरवर नसल्याचे समोर आलेक़ोरोना विषाणूची चाचणी झाल्यानंतर रूग्णांची कोणत्याही प्रकारची नोंद न करता घरी पाठवून होम क्वारंटाईन करण्यात येते़ त्यामुळे सदरील रूग्ण ९ किंवा १४ दिवस घरात न राहता फिरतांना आढळून येतो़ त्यामुळे अन्य नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मात्र तंत्रनिकेतनच्या कोविड सेंटर मधील जबाबदार अधिकाºयांकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार येथील रूग्णांनी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्याकडे केली़
संबधित आरोग्य अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी आयुक्त अजिज शेख यांच्याकडे उपमहापौर अपंळकर यांनी केली आहे़