शहरातील मनपा शाळा होणार तंबाखू मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:17 PM2019-03-12T23:17:43+5:302019-03-12T23:18:22+5:30
शहरात ७४ शाळा : ९० टक्के काम पूर्ण
धुळे : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सलाम मुंबई फाऊंडेशन आणि नेहरू युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा अभिमान अभियान ९० टक्के कामपुर्णत्वास आले आहे़ दरम्यान याअभियानाअंतर्गत महापालिका हद्दीतील ७४ शाळा तंबाखु मुक्त केले जाणार आहे़
तंबाखु मुक्त शाळा अभियानातुन गेल्या दीड वर्षात साक्री तालुक्यात ६४२ शाळा शिंदखेडा तालुक्यात ३१९ शाळा शिरपूर तालुक्यात ४०८ शाळा धुळे ग्रामीण मध्ये ३७५ शाळा आणि धुळे शहरांमध्ये १५४ शाळा अशा एकूण ८९८ शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित झालेल्या आहेत़ या सर्व शाळांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ११ निकष पूर्ण केले आहेत़
हे अभियान पुणे जिल्ह्यात सुरू करण्यासाठी आणि धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सतीश पाटील आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प संचालक यशदा पुणे व सलाम मुंबई फाऊंडेशन वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिलांकर यांच्या सहकार्याने विवाह मंडळ बसावे व जिल्हा आणि तालुक्यातील स्वयंसेवी संस्था या प्रयत्नशील आहेत़ सदर अभियानात पंकज शिंदे, मोहन पाटील, राजेंद्र माळी निशांत पाटील, नारायण गिरासे बटेसिंग राजपूत, अक्षय पाटील, पवन शंकपाळ, प्रज्ञा माळी यांचे सहकार्य लाभत आहे़ दरम्यान शहरातील ७४ शाळा तंबाखु मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यता आली आहे़ आठवड्याभरात शाळा तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे