अखेर अठराव्या दिवशी संशयित विक्की जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:24 PM2017-08-04T14:24:03+5:302017-08-04T14:24:56+5:30
गुड्या खून प्रकरण : मिताणे येथून घेतले ताब्यात
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित असलेला विकास उर्फ विक्की गोयर याला घटनेनंतर तब्बल अठराव्या दिवशी सटाणा तालुक्यातील धुळे पोलिसांनी जेरबंद केले़ खूनाची घटना १८ जुलै रोजी सकाळी घडली होती़
शहरातील पारोळा रोडवर महापालिकेलगत असलेल्या कराचीवाला खुंट चौकात गोपाल टी नावाचे चहाचे हॉटेल आहे़ या ठिकाणी नामचिन गुंड आणि सध्या जामिनावर सुटलेला गुड्या उर्फ रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख सकाळी फिरायला आला असताना या ठिकाणी थांबला़ त्याचवेळेस एका ८ ते १० जणांची टोळी त्या ठिकाणी दाखल झाली़ त्यांच्यात काही वाद होत असतानाच एकाने त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि त्याच्यावर गोळी झाडली़ त्यानंतर इतरांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले़ अचानक झालेल्या घावमुळे गुड्या जमिनीवर कोसळला़ रक्ताच्या थारोळ्यात तो पडून होता़ त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर ही टोळी तेथून पसार झाली होती़ पोलिस त्यांच्या मागावर असताना संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणाºयांना टप्प्या-टप्प्याने जेरबंद करण्यात येत आहे़ या प्रकरणातील मुख्य संशयित १० तर त्यांना मदत करणारे ५ असे १५ जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत़ आता विकास उर्फ विक्की गोयर याला ताब्यात घेतल्यामुळे मुख्य संशयित ११ झाले आहेत़ आता मोजकेच संशयित जेरबंद होणे बाकी आहे़ घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव करीत आहे़