खूनकरणी पतीला सेंधवा येथून अटक
By Admin | Published: February 4, 2017 12:05 AM2017-02-04T00:05:23+5:302017-02-04T00:05:23+5:30
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथे प}ीचा खून करणारा आरोपी वजीर नामसिंग बारेला याला थाळनेर पोलिसांनी चाचरे फाटा, सेंधवा येथून अटक केली आहे
थाळनेर : शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथे प}ीचा खून करणारा आरोपी वजीर नामसिंग बारेला याला थाळनेर पोलिसांनी चाचरे फाटा, सेंधवा येथून अटक केली आहे. त्याला शुक्रवारी शिरपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला शनिवार्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
भोरखेडा येथील शिवारातील भटूसिंग सुदामसिंग राजपूत यांच्या शेतात रखवालदारीचे काम वजीर बारेला (किरडी. ता. सेंधवा, मध्य प्रदेश) करण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून त्याच्यासह त्याची प}ी व चार मुलांसोबत राहत होता. 27 जानेवारीला वजीर व त्याची प}ी आतलीबाई यांच्या वाद झाला.
त्यात वजीर याने त्याच्या प}ीचा खून केला होता. शेतमालक भटूसिंग यांचे भाऊ विजयसिंग राजपूत हे दुस:या दिवशी सकाळी गायीचे दूध घेण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा त्यांना आतलीबाई या शेतातील झोपडीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले होते. खून केल्यानंतर आरोपी वजीर हा फरार झाला होता.
मुलीने दिली पित्यानेच मारहाण केल्याची माहिती
शवविच्छेदनाच्या अहवालानुसार संबंधित महिलेचा मृत्यू हा धारदार शस्त्राने झाला होता. त्यात मयत महिलेची दहा वर्षाची मुलगी रेखा हिने तिच्या वडिलांनी आईला मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यानुसार वजीर बारेला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.