धुळे शहरासह शिंदखेडा तालुक्यातील नरडाण्यात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:52 PM2018-05-12T22:52:49+5:302018-05-12T22:52:49+5:30

५६ हजाराचा ऐवज : रोख रकमेसह दागिनेही लंपास 

Nadayya Gharghadi in Shindkheda taluka along with Dhule city | धुळे शहरासह शिंदखेडा तालुक्यातील नरडाण्यात घरफोडी

धुळे शहरासह शिंदखेडा तालुक्यातील नरडाण्यात घरफोडी

googlenewsNext
ठळक मुद्देधुळ्यासह नरडाण्यात घरफोडीरोख रक्कमेसह ऐवज लंपासपोलीस ठाण्यात घटनेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळ्यातील बिलाडी रोडसह नरडाण्यात चोरट्याने घरफोडी केली़ रोख रकमेसह दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ याप्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ 
बिलाडी रोडवरील घटना
धुळ्यातील बिलाडी रोडवरील धु्रवतारा अपार्टमेंटमध्ये राहणाºया आशाबाई गोविंद कुलकर्णी (५०) यांनी देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला़ घरातील सामान अस्ताव्यस्त केला़ गोदरेज कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये रोख आणि २५ हजाराचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले़ चोरीची ही घटना गुरुवारी रात्री १० ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली़ आशाबाई कुलकर्णी यांनी देवपूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास देवपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक फरीद शेख करीत आहेत़ 
नरडाण्यातील घटना
देवमढी चौक, नरडाणा येथे राहणारे कृष्णा रामदास सोनवणे यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, नरडाणा गावाच्या शिवारात मेलाणे रस्त्याच्या लगत दीपक ब्राह्मण यांचे घर आहे़ या घरात शुक्रवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करत ४ हजार रुपये रोख आणि २ हजार ५०० रुपये किंंमतीचे देवाचे पितळी धातुचे दागिने चोरुन नेले आहे़ ही घटना लक्षात आल्यानंतर कृष्णा सोनवणे यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ घटनेचा तपास सुरु आहे़ 

Web Title: Nadayya Gharghadi in Shindkheda taluka along with Dhule city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.