धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्धनग्न होवून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:25 PM2020-05-21T13:25:01+5:302020-05-21T13:52:20+5:30
धुळे : स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य मिळत नसल्याने एका इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क अर्धनग्न होवून आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची ...
धुळे : स्वस्त धान्य दुकानातून पुरेसे धान्य मिळत नसल्याने एका इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क अर्धनग्न होवून आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली़
राजेंद्र देवीदास वाघ (३४, रा़ समता नगर, साक्री रोड, धुळे) असे या इसमाचे नाव आहे़ गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमाराला हा प्रकार घडला़ एवढ्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी फारसे आले नव्हते़ पोलिसही नव्हते़ कार्यालयाच्या परिसरात शांतता होती़
स्वस्त धान्य दुकानात पुरेसे धान्य मिळत नसल्याचे सांगत सदर इसमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आत शिरुन अंगावरील सर्व कपडे काढले आणि नग्न होवून आरडाओरड सुरु केली़ दरम्यान, प्रवेशद्वारावर असलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी हटकल्यानंतर या इसमाने चड्डी घातली आणि प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गेला़ त्यावेळी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले़
कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरुन सदर माहिती अधिकाºयांना दिल्यानंतर प्रशासनाची एकच तारांबळ उडाली़ दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येवून सदर इसमाला ताब्यात घेतले़ त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़