चौकाला माजी राष्ट्रपती कलाम यांचे नाव द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:19 PM2019-03-12T23:19:18+5:302019-03-12T23:19:59+5:30
महापालिका : विश्व हिंदू परिषदेची मागणी
धुळे : शहरातील गल्ली क्रमांक दोन व चैनी रस्त्यावरील चौकाला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे महापालिकेचे नगरसचिव मनोज वाघ यांना देण्यात आले.
परमाणु क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या केल्यामुळे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव जगभर प्रसिध्द आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक प्रभावी धोरण आखली. त्यांना मिसाईल मॅनच्या नावानेही संबोधले जाते. त्यांना पद्मविभूषण व भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
देश विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांच्या कायार्तून भावी पिढीला प्रेरणा मिळते. त्यामुळे शहरातील गल्ली क्रमांक दोन व चैनी रस्त्यावरील चौकाला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, महासभेत याविषयावर चर्चा करावी, असे निवेदनात म्हटले आहे़
निवेदनावर प्रशांत मोराणकर, विनोद सोमानी, राजदीप बोरसे, संजय चौधरी, हरी मुंदडा, हर्षल गवळी, राजेश पाटील, योगेश गोसावी, प्रदीप जाधव, डॉ. पंकज देवरे, संदीप चौधरी, राजू महाराज मराठे, संजय पाटील, शेखर मराठे, रोहित चांदोडे, रोहित विभांडीक, चेतन मंडोरे, जितेंंद्र नेवे आदींच्या सह्या आहेत़