सभेचे नाव देशासह परदेशातही़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 09:56 PM2018-11-27T21:56:01+5:302018-11-27T21:56:47+5:30

शंकर अभ्यंकर : सत्कार्योत्तेजक सभेचा शतकोत्तर रौप्य महोत्सवात विचार 

Name of the meeting abroad with country | सभेचे नाव देशासह परदेशातही़

सभेचे नाव देशासह परदेशातही़

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : नानासाहेब देव यांनी समर्थांच्या विचारांची प्रेरणा घेऊन धुळ्यात सत्कार्योत्तेजक सभेची स्थापना केली होती़ आज या संस्थेने १५० वर्षाची वाटचाल पूर्ण करून मोठे वटवृक्षात रुपांतर केले़ सकार्योत्तेजक सभेने देशासह परदेशात देखील नावलौकीक केला असल्याचे मत गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले़
शहरातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरात मंगळवारी सत्कार्योत्तेजक रौप्य महोत्सव सांगता पार पडला़ यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे गुरूदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते समर्थ हृदय नानासाहेब देव सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले़ तर शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या ‘युगद्रष्टे समर्थ’ या स्मरणीकेचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा़ प्रकाश पाठक यांच्या हस्ते झाले़ नानासाहेब देव यांनी भाविष्याचा विचार करुन या संस्थेची निर्मिती केली़ ही भूमी म्हणजे सतांची भूमी आहे़ संस्थेच्या माध्यमातुन महाराष्ट्रासह परदेशातील अभ्यासकांपर्यत ज्ञानगंगा पोहचू शकली़  भारतात २४ वर्ष आक्रमण झालीत़ तरी देखील वेद, पुराणे, मंदिर, संस्कृती नष्ट होऊ शकलेली नाही़ कारण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात हिंंदू संस्कृती टिकवून ठेवण्याचे कार्य केले, म्हणूनच संताचे योगदान देशासाठी महत्वाचे आहे असेही ते म्हणाले़ 
दरम्यान, सत्कार्योत्तेजक सभेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, आप्पासाहेब धर्माधिकारी, साधना जोशी आदींनी पत्राद्वारे शुभेच्छा पाठविल्या़ 

Web Title: Name of the meeting abroad with country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे