नरेंद्र पाटील बैठकीसाठी अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईत परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:40 AM2018-03-06T11:40:09+5:302018-03-06T11:40:09+5:30

विखरण देवाचे : जमिनीचा वाढीव मोबदला प्रकरण; आज मंत्रालयात पुन्हा बैठक

Narendra Patil again went back to Mumbai for a meeting! | नरेंद्र पाटील बैठकीसाठी अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईत परतले!

नरेंद्र पाटील बैठकीसाठी अर्ध्या रस्त्यातून पुन्हा मुंबईत परतले!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या आठवड्यात ‘महाजनको’ ने ४८ लाख रुपये वर्ग केल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी पुढील भूमिका ३ मार्चला जाहीर करेल, असे म्हटले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे विखरण देवाचे येथील घर बंद आहे.नरेंद्र पाटील वाढीव मोबदल्यासाठी मुंबईत मंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आहे. त्यामुळे आज मंत्रालयात होणाºया बैठकीत काय निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : विखरण देवाचे येथील धर्मा पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा लहान मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी मंत्रालयस्तरावर लढा सुरू केला आहे. सोमवारी मंत्रालयात झालेली बैठक फिस्कटल्यानंतर नरेंद्र पाटील व त्यांचे नातेवाईक हे धुळ्यात आज पत्रपरिषद घेऊन त्यांची भूमिका मांडणार होते. त्यानुसार ते रात्री धुळ्याकडे येण्यासाठी निघाले होते. परंतु, त्यांना पुन्हा चर्चेसाठी आज मंत्रालयात बोलविल्यामुळे ते मुंबईकडे परतल्याची माहिती  नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 
शिंदखेडा तालुक्यातील मेथी-विखरण देवाचे येथे औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची जमिन संपादीत झाली होती. परंतु, त्यांना त्यांच्या शेतजमिनीला लागून असलेल्या शेतकºयापेक्षा अल्प मोबदला मिळाला होता. त्यासाठी धर्मा पाटील यांचा संघर्ष सुरू होता. परंतु, त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात आत्महत्या केली होती. २८ जानेवारीला त्यांचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येनंतर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने धर्मा पाटील यांची संपादीत केलेल्या जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात आले होते. त्याचा अहवाल सादरही करण्यात आला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात ‘महाजनको’ ने ४८ लाखाचे सानुग्रह अनुदान त्यांना दिले होते. परंतु, नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या शेत जमिनीला लागून असलेल्या जमिनीला जो १ कोटी ८९ लाख रुपयांचा मोबदला मिळाला; तोच मोबदला आम्हांलाही मिळायला हवा; अशी मागणी केली आहे. 

सोमवारी बैठक फिस्कटली 
वाढीव मोबदल्यासाठी सोमवारी मंत्रालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ‘महाजनको’ चे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला नरेंद्र पाटील, त्यांचे नातेवाईक रोहन सोनवणे उपस्थित होते. परंतु, ही बैठक फिस्कटली. शासन ४८ लाख रुपयांवर ठाम असल्याचे रोहन सोनवणे यांनी सांगितले होते. त्यामुळे मंगळवारी नरेंद्र पाटील हे धुळ्यात पत्रपरिषद घेऊन भूमिका मांडणार असून जमिन संपादीत करणारे अधिकारी व सरकारविरूद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार नरेंद्र पाटील व त्यांचे नातेवाईक हे धुळ्याकडे निघाले होते. परंतु, त्यांना अर्ध्या रस्त्यातून फोन आल्यामुळे ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

Web Title: Narendra Patil again went back to Mumbai for a meeting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.