डाव्यांच्या किसान मोर्चात नरेंद्र पाटील झाले सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:04 PM2018-03-11T17:04:24+5:302018-03-11T17:05:48+5:30

प्रतिक्रिया : शासनाने लक्ष दिले नाहीतर शेतकरी नक्षलवादी मार्ग स्विकारतील

Narendra Patil got involved in the Left Front Kisan Morcha | डाव्यांच्या किसान मोर्चात नरेंद्र पाटील झाले सहभागी

डाव्यांच्या किसान मोर्चात नरेंद्र पाटील झाले सहभागी

Next
ठळक मुद्देडाव्यांनी नाशिक येथून काढला मोर्चामोर्चात नरेंद्र पाटील सहभागी झालेप्रकृती बिघड्याने रविवारी विखरणला परतले

आॅनलाईन लोकमत

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील प्रस्तावितऔष्णिक प्रकल्पात जाणाºया शेती जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील  यांचा मुलगा नरेंद्र पाटील डाव्या पक्षांच्या किसान लाँग मोर्चामध्ये  सहभागी झाले. मात्र प्रकृती बिघडल्याने रविवारी विखरणला परतले. शासनाने शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकरी नक्षलवादी मार्ग स्विकारण्याची भिती नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकºयांच्या विविध मागण्यासंदर्भात नाशिक येथून निघालेल्या डाव्या पक्षांच्या लाँग मोर्चामध्ये शनिवारी रात्री विखरणचे नरेंद्र पाटील हे मुंबईत जाऊन मोर्च्यात सहभागी झाले. मार्चसोबत पाच ते सहा किलोमीटर चालल्यानंतर प्रकृती खराब झाल्याने ते विखरणला परतले. प्रकृती खराब झाल्याने आपण रविवारी विखरण  या गावी परतल्याचे  नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
सामूहीक आत्महत्येचा इशारा
शासनाने आपल्या मागणीकडे लक्ष दिले नाहीतर आपण सामूहीकरित्या आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील आंदोलनात  सहभागी होण्याचे आवाहन
दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. यावेळी अण्णा हजारे यांनी यासंदर्भात सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच दिल्लीत आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.

Web Title: Narendra Patil got involved in the Left Front Kisan Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.