राष्टÑपुरूषांच्या त्यागाचे चिंतन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:59 AM2020-01-23T11:59:33+5:302020-01-23T11:59:51+5:30
जयहिंद हायस्कुलमध्ये झालेल्या व्याख्यानात प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे :वर्तमान परिस्थितीत युवकांम्ध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षणाबरोबर मुल्यसंस्कार करण्यासाठी महापुरुषांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रासाठी दिलेल्या समर्पण व त्यागाचे चिंतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्र धुळे संचालक तथा झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे येथील प्रा. डॉ.प्रवीणसिंग गिरासे यांनी आज येथे केले.
जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती निमित्त आयोजित समारंभात डॉ.गिरासे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सरला पाटील होत्या. पर्यवेक्षक संजय देवरे, स्वामी विवेकानंद केंद्र धुळे शहर प्रमुख किशोर बोरसे उपस्थित होते.
प्रा.गिरासे पुढे म्हणाले शहाजीराजे व जिजाऊ यांनी एकत्र पाहिलेल्या स्वराज निर्मितीच्या स्वप्नपूर्तीसाठी जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत परकीय तसेच स्वकीयांशी संघर्ष करत भारतीय समाजात आत्मविश्वास निर्माण केला. शिवरायांचा राज्याभिषेक करुन स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी प्रस्थापितांच्या विरोधास न जुमानता सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वामी विवेकानंद यांनी पारतंत्र्यात असलेल्या भारतीय समाजात आपल्या क्रांतिकारी व मानवतावादी विचारांनी स्वाभिमान जागृत करत भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रखर केली. सूत्रसंचालन मनिषा बच्छाव तर आभार हेमलता ठाकरे यांनी मानले.