धुळे महामार्गावर राष्ट्रवादीतर्फे आंदोलन
By admin | Published: June 7, 2017 12:49 PM2017-06-07T12:49:39+5:302017-06-07T12:49:39+5:30
‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.7 - शेतकरी संपाच्या सलग सातव्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतर्फे धुळे तालुक्यातील धुळे-औरंगाबाद महामार्गावरील विंचूर चौफुलीवर बुधवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिणामी, महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका वाहनचालकांना बसला.
शेतक:यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात सरकारला अपयश येत असल्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या पदाधिका:यांनी आंदोलनाच्या वेळी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे धुळे-औरंगाबाद व पारोळा-मालेगाव महार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे किरण शिंदे व किरण पाटील यांनी केले. यावेळी प्रभाकर पाटील, प्रकाश बोरसे, जनार्दन देसले, वसंत पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ देवरे उपस्थित होते.
30 क्विंटल भाजीपाल्याची आवक घटली
धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी 350 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती. परंतु, आज केवळ धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनच 320 क्विंटलच भाजीपाला येऊ शकल्यामुळे दुपारी बारा वाजेर्पयत भाजीपाला विक्री करून विक्रेते घरी परतल्याचे चित्र बाजार समितीत दिसून आले.
नेर येथे संपाची धग कायम
धुळे तालुक्यातील नेर येथे संपाची धग सलग सातव्य दिवशीही कायम दिसून आली. येथील संतप्त शेतक:यांनी म्हसदीकडून येणा:या भाजीपाल्याची गाडी आडवून भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शिंदखेडा, शिरपूर येथे व्यवहार सुरळीत
बुधवारी शिंदखेडा व शिरपूर येथे सुरळीत व्यवहार सुरू होता. भाजीपाल्याची आवकही समाधानकारक असल्यामुळे आज काही अंशी भाजीपाल्याच्या किंमती उतरल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.