राष्ट्रीयकृत बँकेची तिजोरी चक्क कॅशलेस!
By Admin | Published: January 20, 2017 12:22 AM2017-01-20T00:22:56+5:302017-01-20T00:22:56+5:30
जैताणेतील आर्थिक जातं जाम : 25 जानेवारीला मिळणार ग्राहकांना रोकड
जैताणे, ता.साक्री : नोटाबंदी नंतर साक्री तालुक्यातील माळमाथ्यावरील बँकींग व्यवहार अद्याप सुरळीत झालेले नाही. दरम्यान, रोकड नसल्याने सेंट्रल बँकेच्या जिल्ह्यातील 15 शाखांमधील कामकाज गुरुवारी बंद होते, अशी माहिती व्यवस्थापकांनी दिली. जैताणे येथील सेंट्रल बँकेच्या शाखेबाहेर 25 जानेवारी रोजी कॅश उपलब्ध होईल, असा फलकच लावण्यात आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
24 हजारार्पयत रक्कम काढण्याची मुभा असतांना जैताणे सेंट्रल बँकेच्या शाखेत फक्त पाच हजार रुपयेच दिले जात आहेत. गुरुवारी तर तेवढेसुद्धा मिळाले नाही. ग्रामस्थांनी बँकेचे अधिकारी व कर्मचा:यांशी बोलण्याचा प्रय}ही केल्यावरही काहीच उत्तर मिळाले नाही.
24 रोजी जैताणे बँक शाखेला रोकड प्राप्त होईल, तेव्हाच ग्राहकांना पैसे देणे शक्य आहे. आज कुसुंबा येथे काम सुरू आहे. त्यामुळे बॅँकेच्या जिल्ह्यातील 15 शाखा कार्यालयांचे काम गुरूवारी बंद होते.
- अमितकुमार, व्यवस्थापक, सेंट्रल बॅँक जैताणे शाखा