नावालाच ‘झाडे लावा, झाडे जगवा’

By admin | Published: January 16, 2017 12:36 AM2017-01-16T00:36:52+5:302017-01-16T00:36:52+5:30

मनपा : दहा हजार रोपे लागवडीचा दावा, प्रत्यक्षात पाचशे रोपेही नाही

Navaala 'plant trees, grow trees' | नावालाच ‘झाडे लावा, झाडे जगवा’

नावालाच ‘झाडे लावा, झाडे जगवा’

Next


धुळे : शासनाने जुलै 2016 ला राबविलेल्या दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेत पुरेशी रोपे उपलब्ध न झाल्याने मनपा प्रशासनाने गांडूळ खत प्रकल्पाच्या जागेत रोपवाटिका तयार करून 10 हजार रोपांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र मनपाने संवर्धन केलेली रोपे 500 पेक्षाही कमी असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आल़े
राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे धोरण शासनाने जुलै 2016 मध्ये आखले होत़े सदर मोहिमेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते व त्यानुसार धुळे जिल्ह्यात साडेसहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते, तर महापालिकेच्या हद्दीत अडीच हजारावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े
वृक्षारोपणाच्या या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यासाठी मनपाने शहरात 2 हजार 600 खड्डे खोदून तयार ठेवल़े मात्र सामाजिक वनीकरण विभागाकडून मनपाला केवळ 1 हजार 750 रोपे उपलब्ध झाल्याने खोदून ठेवलेले खड्डे नंतर बुजविण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर उद्भवली होती़  सदरचा प्रकार गांभीर्याने घेत मनपा प्रशासनाने स्वत:चीच रोपवाटिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता़ 
शहरातील वरखेडी रोडवरील गांडूळ खत प्रकल्पाच्या जागेवर एका बाजूला रोपवाटिकेसाठी जागा करण्यात आली व विशिष्ट आकाराच्या पिशव्यांमध्ये माती आणि खत टाकून बीजारोपण करण्यात आले होत़े सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार बीजारोपण करण्यात येत असून भविष्यात 1 लाख रोपे वाटिकेत तयार करण्याचा मानस असल्याचे त्यावेळी मनपा प्रशासनाने स्पष्ट केले होत़े स्थायी समिती सभापती सोनल शिंदे व सुमन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय चांडक यांनी याकामी पुढाकार घेत रोपांसाठी बिया व प्लॅस्टिक पिशव्या उपलब्ध करून दिल्या होत्या़ त्यानुसार मनपाने बीजारोपण केले खऱे; परंतु प्रत्यक्षात 10 हजार नव्हे तर 500 पेक्षा कमी रोपांची लागवड करण्यात आल्याचे दिसून आले आह़े पांझरा जलकेंद्रात या रोपांचे संवर्धन केले जात आह़े अनेक पिशव्यांमध्ये केवळ माती भरून ठेवण्यात आली आह़े त्यामुळे इतक्या कमी रोपांची लागवड का करण्यात आली? उर्वरित बिया व पिशव्यांचे काय झाले हे मनपा प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आह़े मनपाने केलेला 10 हजार वृक्ष लागवडीचा दावा फोल ठरला आह़े


मनपास रोपवाटिका तयार करून वृक्ष संवर्धन करण्यासाठी मागील वर्षी सहकार्य केले होत़े शिवाय दोन ते तीन हजार बिया दिल्या होत्या़ त्यानंतर सर्व बीज लागवड होणे आवश्यक होत़े
              -विजय चांडक
अध्यक्ष, सुमन फाउंडेशन

महापालिकेला वृक्ष लागवड करण्यासाठी साडेसात हजार प्लॅस्टिक पिशव्या दिल्या आहेत़ पाच हजार झाडे लावण्यात आली आह़े झाडे लावल्यानंतर पाहणी केलेली नाही़
-सोनल शिंदे
स्थायी समिती सभापती

 

Web Title: Navaala 'plant trees, grow trees'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.