डेपोतील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:11 PM2019-09-28T13:11:44+5:302019-09-28T13:12:18+5:30

महापालिका : कचरा डेपोजवळील भटक्या कुत्र्यांचा वरखेडीकरांना होतोय त्रास आणि मनस्ताप

Need to dispose of waste in depot | डेपोतील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची गरज

dhule

googlenewsNext

धुळे : शहरातून दररोज संकलित केला जाणारा कचरा वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये टाकला जातो़ परंतु या कचरा डेपोची क्षमता पूर्ण झाल्याने कचरा संकलित केल्यानंतर तो डेपोबाहेरील रस्त्यावरच टाकला जात होता़ परिसरातील अस्वच्छतेअभावी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने कचरा डेपो स्थलांतरित केली जात आहे़
स्वच्छतेमुळे वाढला ताण
महापालिकेकडून सध्या ८५ घंटागाड्या व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा संकलन होत असून दररोज १२५ ते १५० मेट्रिक टन कचरा संकलित होतो़ परंतु या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी उद्याप कोणताही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही़ त्यामुळे नुकत्याच स्वच्छतेच्या पाहणीसाठी आलेल्या समितीकडून देखील याप्रश्नी नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ शहरातून संकलित झालेला कचरा डेपोवर टाकला जातो़ मात्र कचरा डेपो भरल्यामुळे काही कर्मचारी रस्त्यावर कचरा टाकतात़ त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे़

Web Title: Need to dispose of waste in depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे