संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:50 AM2018-11-24T11:50:26+5:302018-11-24T11:52:00+5:30

अतुल जोशी

The need to pay attention to the organization building | संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची आवश्यकता

Next

महानगरपालिका निवडणूक म्हणजे आगामी काळात होणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला सर्वच जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. काही प्रभागात तर उमेदवारच मिळालेले नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे आगामी काळात होणाºया  निवडणुकीत स्वबळावर यश मिळविण्यासाठी शिवसेनेला शहरासह जिल्हयात आतापासून संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल हे निश्चित.
केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी यापुढील काळात होणाºया सर्वच निवडणुका स्वबळावरच लढून आपली ताकद अजमावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. 
 दोन वर्षांपूर्वी पक्षाने  बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना   पद दिले. त्यांच्या काळात पक्षाचे संघटन पाहिजे त्या प्रमाणात विस्तारले नाही अशी चर्चा खुद्द शिवसेनेतील काही पदाधिकारी खाजगीत करतात. त्यांच्याकाळात संघटना बांधणीकडे, नवीन शाखा सुरू करण्याकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होते, तसे न होऊ शकल्याने, त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार मिळण्यावर झाला. पक्षाकडे  मनपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या अर्जांची भाऊगर्दी झालेली असली तरी एकाच प्रभागातून दोन-तीन जण इच्छूक असल्याने, अर्जाचा आकडा मोठा दिसत होता. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला ७४ जागांपैकी फक्त ५० जागांवरच उमेदवार मिळाले. त्यातही विद्यमान नगरसेवकांपैकी फक्त तिघांनीच मुलाखती दिल्या. मुस्लिम बहूल भागात उमेदवार मिळाले नाहीत. तर आठ प्रभागांमध्ये चार-चार उमेदवारही मिळाले नाही, हे उमेदवारी यादीवरून स्पष्ट होते. 
पक्षाच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत शहरात दोनवेळा येऊन गेले. तर जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांचाही सारखा दौरा असतो. असे असतांनाही पक्षाला पुरेसे उमेदवार मिळू नयेत  याचे चिंतन  करून संघटनात्मक बांधणी किती करणे गरजेचे आहे, याचा विचार पक्षातील पदाधिकाºयांनी करणे गरजेचे झालेले आहे. 
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचेच नाही तर अवघ्या महाराष्टÑाचे लक्ष लागून आहे. कारण ही निवडणूक शिवसेनेसाठी आगामी निवडणुकीची रंगीत तालीम आहे. लोकसभेची निवडणूक चार-पाच महिन्यांवर येऊन ठेवली आहे. त्यापाठोपाठ विधानसभेचीही निवडूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये   सेनेला यश मिळवायचे असेल तर संघटनेचे जाळे मजबूत असणे गरजेचे आहे. तरच जी अपेक्षा आहे, ती पूर्ण होऊ शकेल.  महागरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या दोन गटांसह कॉँग्रेस-राष्टÑवादी व इतर लहान-लहान पक्षांशी शिवसेनेचा  ‘सामना’ आहे. या निवडणुकीत आपली ताकद, वर्चस्व सिद्ध करून दाखविण्याची शिवसेनेला संधी मिळाली असून, या संधीचे सोने करून घेण्यात पक्ष कितपत यशस्वी ठरतो, ते निकालानंतर स्पष्ट होईल. जनमताचा अंदाजही निकालानंतरच समजेल. आगामी काळ हा निवडणुकांचाच असल्याने, त्यात यश मिळविण्यासाठी पक्षाने संघटनाबांधणीकडे लक्ष देणे आतापासून गरज निर्माण झाली आहे. यात पक्षाचे पदाधिकारी कितपत यशस्वी होतात, ते येणाºया काळात समजणार आहे.

Web Title: The need to pay attention to the organization building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.