शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:01 PM2019-08-03T12:01:06+5:302019-08-03T12:02:21+5:30
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा हगणदारीमुक्त झाला असला तरी आता शाश्वत स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. शौाचालये उभी राहीली मात्र आता त्यांचा निरंतर वापर होण्यासाठी लोकांशी वर्तणूक बदलाचा संवाद साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा-२ साठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली, त्यावेळी अध्यक्षपदावरून वान्मती सी. बोलत होत्या. व्यासपीठावर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे (शिंदखेडा), चंद्रकांत भावसार (साक्री), वाय.डी.शिंदे (शिरपूर), राघवेंद्र घोरपडे (धुळे) उपस्थित होत्या.
वान्मती सी.म्हणाल्या, ग्रामपंचायत स्तरावर वैय्यक्तीक शौचालयांची कामे झाली.मात्र आता ग्रामस्थांमध्ये शौचालय वापराबाबत जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा हगणदारीमुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पहिल्या टप्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. आता टप्पा-२ची पडताळणी होणार आहे.
राज्यस्तरावरून प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रकांत कचरे यांची उपस्थिती होती. कचरे यांनी पडताळणी करतांना घ्यावयाची काळजी,विविध टप्पे, यंत्रणेचा समन्वय, आदींबाबत माहिती दिली.
प्रास्ताविम मधुकर वाघ यांनी केले. विजय हेलिंगराव यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी कार्यक्रम व्यवस्थापक ई.टी.चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र नेरकर यांनी परिश्रम घेतले.