उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:22 AM2018-12-24T11:22:24+5:302018-12-24T11:22:51+5:30

रवींद्र टोणगावकर : दोंडाईचा येथे रोटरी सिनिअर्सतर्फे शैक्षणिक दिशा कार्यक्रम

New direction received by students from the program | उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा

उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शैक्षणिक दिशा  कार्यक्रमामुळे  विद्यार्थ्यांर्ना अभ्यास, शिक्षणासह व चांगले जीवन जगण्याची  दिशा मिळणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय शल्य चिकित्सक संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र टोणगावकर यांनी केले.
दोंडाइचा येथे रोटरी क्लब आॅफ सिनिअर्सतर्फे आयोजित व जयकुमार रावल इंस्टिट्यूट आॅफ  टेक्नॉलॉजी प्रायोजित  दोन दिवशीय शैक्षणिक दिशा-२०१८ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे उद्घाटन स्वो.वि. संस्थेचे चेअरमन सरकारसाहेब रावल यांच्याहस्ते करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रवींद्र टोणगावकर  होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वो.वि. संस्था खजिनदार  सी.एन. राजपुत, के.एम. अग्रवाल, आयोजक तथा रोटरी सिनीअर्सचे अध्यक्ष अ‍ॅड.नितिन अयाचित, रोटरी पतपेढीचे सुरेश जैन, अहिंसा इंटरनॅशनलचे राजेश मुणोत, प्रोजेक्ट चेअरमन के.टी. ठाकुर, रवींद्र पाटील, डॉ.मुकुंद सोहोनी, डॉ.अनिल सोहोनी, लक्ष्मण वाघ,  नामदेव थोरात, राजेश भंडारी, विजय अडगाळे, प्रा.दिलीप वाघेला, डॉ.आशा टोणगावकर, सौरभ अग्रवाल, शेखर कोठारी, सुमित जैन  आदी होते.
दोन दिवशीय दिशा कार्यक्रमात दोंडाईचा व परिसरातील विविध शाळांतील १५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यात विविध विषयावरील अभ्यासाच्या संधी, जेईई, नीट आदींविषयी प्रा.डॉ.नरेंद्र परदेशी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन के.टी. ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोफत लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. त्यात शालेय दप्तर व सायकल वाटप करण्यात आली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुराधा सोहोनी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सचिन पारख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनिअर्सच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

Web Title: New direction received by students from the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे