मनपाकडे नवजात बालक तपासणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:46 PM2019-09-09T22:46:07+5:302019-09-09T22:46:43+5:30

लुपीन फाऊंडेशनकडून आर्थिक मदत, अर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी या यंत्राचा उपयोग

Newborn baby screening device | मनपाकडे नवजात बालक तपासणी यंत्र

मनपाकडे नवजात बालक तपासणी यंत्र

Next

धुळे : नवजात बालकांसाठी तपासणी करणारे यंत्र लुपीन फाऊंडेशनच्या मदतीने महापालिकेत दाखल झाले आहे़ ७ लाख रुपये त्याची किंमत असून महापालिकेच्या रुग्णालयात ते लावण्यात येणार आहे़ या यंत्राचे उद्घाटन महापालिकेच्या सभागृहात सोमवारी करण्यात आले़
नवजात अर्भक जन्माला आल्यानंतर काही वेळेस ते रडत नाही़ त्यावेळेस श्वास घेण्यासाठी काही अडचणी आहेत का अन्य काही कारण हे समजण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नव्हती़ बाळाला अशावेळेस जिल्हा रुग्णालयात अथवा खासगी दवाखान्यात तपासणीसाठी नेले जात होते़ ही अडचण समजून घेऊन यासंदर्भात लुपीन फाऊंडेशनने महापालिकेला ७ लाख रुपये किंमतीचे ‘निओनेटल रेस्पीरेटर’ नावाचे यंत्र समारंभपूर्वक सुपुर्द केले़ यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह लुपिनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश राऊत, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक डॉ़ हेमंत भदाणे उपस्थित होते़ 
अर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी या यंत्राचा उपयोग होईल़ हे यंत्र कोणीही हाताळू शकते़ त्यासाठी कुशल कर्मचाºयाची गरज नाही़ हे यंत्र पुर्णपणे भारतीय बनावटीचे आहे़ मनपाला याचा उपयोग होणार आहे़ 
 

Web Title: Newborn baby screening device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे