नवविवाहितेने पतीच्या डोक्यात मारली मुसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:37 AM2017-07-21T00:37:10+5:302017-07-21T00:37:10+5:30

धरणगाव : गिफ्ट देण्याचा बहाण्याने नेले गच्चीवर

The newlyweds hit the head of the husband | नवविवाहितेने पतीच्या डोक्यात मारली मुसळ

नवविवाहितेने पतीच्या डोक्यात मारली मुसळ

Next

धरणगाव : येथील पगारिया परिवारात अवघ्या बाविस दिवसांपूर्वी सून म्हणून आलेल्या उच्चशिक्षित नवविवाहितेने गिफ्ट देण्याच्या बहाण्याने पतीला इमारतीच्या गच्चीवर घेवून जावून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, आणि त्याच्या डोक्यावर मुसळ मारून गंभीर दुखापत केल्याची घटना दि.19 च्या रात्री घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात धरणगाव पोलिसात या नवविवाहितेविरुध्द 20 रोजी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        पोलीस सूत्रानुसार,      येथील  व्यापारी सुनिल पगारिया यांचा  फार्मसीचे शिक्षण झालेला मुलगा दर्शन याचे बावीस दिवसांपूर्वी चहार्डी ता.चोपडा येथील दिपालीशी   लग्न झाले. लगAानंतर मात्र या नवविवाहितेचे चित्त घरात लागेना.  पतीशीही तिचा संवाद नव्हता, यात   19 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास  दीपालीने दर्शनला आपण गप्पा मारायला इमारतीच्या गच्चीवर जाऊ असे म्हणत आज तुम्हाला मी विशेष गिफ्ट देणार असल्याचे सांगितले . प}ीच्या प्रेमळ बोलण्याला भुललेला दर्शन तिच्या सोबत गच्चीवर गेला. यावेळी तिने प्रेमाच्या गप्पा करीत तुमच्या डोळ्याला रुमाल बांधून मला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगीतले. आणि दर्शनचे डोळे बांधले.  त्याचवेळी हातात ग्लोव्हज् घालून लपवलेली मुसळी काढून त्याच्या डोक्याच्या मागील भागावर दणादण दोन दणके हाणले. या प्रहारामुळे दर्शनने जोरात आरडाओरड केल्याने घरचे व आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला  डॉक्टरांकडे नेण्यात आले. तथापि दर्शनला  मेंदूच्या भागाला मार न लागल्याने तो या हल्ल्यातून बचावला. या घटनेप्रकरणी दर्शनने  दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात भादंवि 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो.नि.बी.डी.सोनवणे, सहायक फौजदार गंभीर शिंदे, लालसिंग पाटील व सहकारी करीत आहे. 

Web Title: The newlyweds hit the head of the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.