वसमार परिसरात रात्री होतो बिबट्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:15 PM2019-02-23T12:15:44+5:302019-02-23T12:16:29+5:30
शेतकऱ्यांमध्य प्रचंड भीती : वन विभागाला होतेय पिंजाºयाची मागणी मात्र अद्याप पूर्तता नाही
म्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार गुरुवारी साडेनऊ वाजता रात्रीचे लाइट आल्यावर सालदार पीकांना पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता त्याला काही मिनिटांत बिबट्या पाहण्यास मिळाला. डाबरी शिवारात पोलीस पाटील यांच्या शेताजवळ असलेले शिवदास सुकलाल येळीस यांच्या शेतांमध्ये पिकांना पाणी देताना माधव सुकदेव सोनवणे याला प्रत्यक्षात बिबट्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी तो भयभीत झाला आणि त्याच्या मालकाला फोन केला.
बिबट्या दिसल्याचा फोन आल्यानंतर मालकांसोबत गावातील शेतकरी व परिसरातील शेतकरी सात-आठजण घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्या ठिकाणी मेंढीचा वाडा होता. काही अंतरावर मेंढीला ओढत आणून पोलीस पाटीलांच्या शेतामध्ये मेंढीला फस्त केले होते.
त्या ठिकाणी त्याच कातडे देखील पडलेले होते. घटनास्थळी माजी सरपंच व्यंकट नेरे, रवींद्र येळीस, पवन येळीस, समाधान येळीस, प्रवीण नेरे, मनोहर भामरे, दीपक येळीस, योगेश नेरे, अविनाश नेरे, सुशील नेरे, मछिंद्र नेरे, विनोद नेरे, धर्मराज राजस्थानी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांना देखील कांद्याच्या शेतामध्ये पाणी भरत असताना सालदारास एकाच ठिकाणी तीन बिबटे निदर्शनास आले. एक बिबट्या मादी आणि दोन पिल्लू तिच्या बरोबर होते, असे तीन बिबटे एकाच ठिकाणी एका शेतामध्ये निदर्शनास आले होते आणि बिबट्यांचे ठसे देखील कांद्याच्या शेतांमध्ये दिसले आहेत. त्या ठिकाणी सर्वजण गेल्यानंतर त्यांना सुद्धा प्रत्यक्षात काही अंतरावर टॉर्चचा फोकस मारल्यानंतर बिबट्याचे डोळे चमकले. तिथून तो फरार झाला.
वन विभागाने वसमार परिसरामध्ये खबरदारीचे अद्यापही पाऊल उचलले नाही. बºयाच दिवसांपासून ग्रामस्थांतर्फे पिंजºयाची मागणी होत आहे. तरी सुद्धा अद्यापही पिंजरा लावण्यात आला नाही.
वसमार परिसरातील शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.