गुरांच्या स्वास्थासाठी मानले जातात नवस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 07:35 PM2017-08-22T19:35:25+5:302017-08-22T19:36:13+5:30
जोगीदेव यात्रोत्सव : माळमाथ्यावर ४० हजार शेतकºयांनी गुरांसह यात्रेत लावली हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
निजामपूर : साक्री तालुक्यात निजामपूरच्या पूर्वेकडे १८ कि.मी. अंतरावरील डोंगर रांगामधील एका डोंगराच्या माथ्यावर जोगीदेव देवस्थान आहे. याठिकाणी पोळ्याच्या दुसºयादिवशी परंपरेनुसार जोगीदेव यात्रा भरते. या यात्रेचे विशेष म्हणजे शेतकरी याठिकाणी गुरांच्या स्वास्थासाठी नवस मानतो आणि ते यात्रेत फेडतो. यात्रेत शेतकरी आपली गुरे घेऊन नवस फेडण्यासाठी तर काही नवस मानण्यासाठी येतात. यंदाही ३० ते ४० हजार शेतकºयांनी यात्रेत गुरांसह हजेरी लावली.
साक्री तालुक्यात गुरांच्या आरोग्यासाठी सुमारे १०० ते १५० वर्षापासून शेतकरी जोगीदेवचा नवस मानतो. नवसाला देव पावला की पोळ्याच्या दुसºया दिवशी भरणाºया यात्रेत ज्या गुरांचा नवस फेडयाचा असतो. त्या गाई, बैल, घोडे, बकºया, मेंढयासह शेतकरी जोगीदेवचे डोंगर चढून जोतो. डोंगराच्या माथ्यावरील जोगीदेव स्थानास प्रदक्षिणा मारतात. आणि दही, दूध, तूप आणि शिºयाचा प्रसाद जोगीदेवला चढवतात. आणि तोच प्रसाद खातात.
माळमाथ्यावर म्हसाळे गावापासून थोडे पुढे गेल्यावर आमोदे फाटयावरुन आमोदे व पुढे आगरपाडा रस्त्यात हिरव्याकंच डोंगर दºयामधून ओढे पार करुन जोगीदेव स्थानावर पायी पोहचतात. हा रस्ता कच्चा आहे. जोगीदेव स्थान हे डोंगरच्या कड्यावर आहे.
पोळ्याच्या दुसºया दिवशी मंगळवारी भल्या पहाटे पासून धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातून शेतकरी बैलगाडी, घोडे, जीप, ट्रक व सायकलीवर तर काही पायी या स्थानावर पोहचत होते. सोबत आपल्या गाई, बकºया, बैल, घोडे व मेंढयासुद्धा होत्या.