युपीएससी परीक्षेतील यशाबद्दल निखिल राखेचा यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:27 PM2019-04-10T21:27:08+5:302019-04-10T21:27:49+5:30
शिंदखेड्यात मिरवणूक काढून जंगी स्वागत
शिंदखेडा : यूपीएससी परीक्षेत १९७ रँक मिळवून आयपीएस झालेल्या निखील अशोक राखेचा यांचे शिंदखेड्यात मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
शिंदखेड़ा येथील शिवाजी चौकात निखील राखेचा याचे आगमन होताच शहरवासियांतर्फे त्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी निखीलने ज्या जनता हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले, त्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व जैन समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शिंदखेडा शहरातून त्यांची मिरवणूक काढली. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, माजी सभापती प्रा.सुरेश देसले, उपनगराध्यक्ष भिला पाटील, नगरसेवक सुनील चौधरी, दिपक अहिरे, सूरज देसले, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. किसान कॉलनीतील निवासस्थानी निखील राखेचा यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी राजेंद्र देसले, अशोक पाटील, डॉ.रमेश देसले, प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी, जैन श्रीसंघचे माजी अध्यक्ष खुशालचंद ओस्तवाल आदी उपस्थित होते. निखील राखेचा यांनी मनोगतातून यूपीएससी परीक्षा खुप अवघड आहे, असा बाऊ केला जातो. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता ही स्पर्धा परीक्षा दिली पाहीजे, असे सांगितले. सूत्रसंचालन अजय राखेचा यांनी केले. आभार प्रा.सी.डी. डागा यांनी मानले. शिंदखेडा येथील किसान कॉलनीतील रहिवासी तसेच स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी अशोक राखेचा व सुषमा राखेचा यांचे ते सुपुत्र आहेत.