मनपा नवीन इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:42 AM2018-12-24T11:42:38+5:302018-12-24T11:43:18+5:30

शासनाकडे निधीची मागणी : अग्निशमन वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव

NMC will set up a 'fire system' in a new building | मनपा नवीन इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविणार

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपाची निवडणूक पार पडताच नवीन प्रशासकीय इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहे़ तर नवीन अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना सादर होणार आहे़ 
३३ लाख रूपयांचा प्रस्ताव
महापालिकेच्या नवीन इमारतीत आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार हायड्रन्ट सिस्टीम, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, फायर एक्स्टींग्युशर बसविण्यासाठी ३३ लाख ५७ हजार १८ रूपये खर्च येणार आहे़ त्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेतली जाणार आहे़ तत्पूर्वी महापालिकेने राज्याच्या अग्निशमन सल्लागारांना प्रस्ताव पाठविला असून तो तातडीने मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे़
वाहन खरेदीसाठी निधी मागणी
शहर हद्दवाढीमुळे अग्निशमन विभागावरील भार वाढला असल्याने अग्निशमन विभागाला बचावाचे कार्य करण्यासाठी एक नवीन अग्निशमन वाहन खरेदी करणे आवश्यक आहे़ केंद्र शासनाच्या ई-मार्केटप्लेस या वेब पोर्टलच्या माध्यमातून खरेदी धोरणासाठी तरतुदींचा अवलंब करून खरेदी करणे बंधनकारक आहे़ अग्निशमन वाहन खरेदीसाठी २ कोटी ५ लाख रूपये खर्च येणार आहे़ पण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत महापालिकेसाठी १ कोटी २ लाख रूपये तरतुद करण्यात आली आहे़ त्यामुळे अग्निशमन सेवांचे बळकटीकरण करणे या योजनेंतर्गत प्रस्ताव आर्थिक, प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे़ 
६३ शाळांना नोटीसा
शहरातील विविध हॉस्पिटल्स, शाळा, सरकारी व खासगी कार्यालये, महाविद्यालये, हॉटेल्स यांना दरवर्षी इमारतीचे फायर आॅडीट करवून घेणे बंधनकारक आहे़ इमारतीचे फायर आॅडीट करवून घेऊन त्यात आवश्यक ती अग्निप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असते़ परंतु फायर आॅडिट न केल्याने अग्निशमन विभागाने ६३ शाळांना नोटीसा बजाविल्या आहेत़

Web Title: NMC will set up a 'fire system' in a new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे