दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कुºहाडीने हल्ला, हॉटेल मालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:52 PM2019-02-12T17:52:06+5:302019-02-12T17:52:47+5:30
धुळे तालुका : मोराणे येथील घटना, तीन जणांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हॉटेलवर येऊन दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता ते देण्यास नकार दिला या कारणावरुन मोराणे शिवारातील हॉटेल मालक बसराज खैरनार यांच्यावर कुºहाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली़ हल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तीन संशयितांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला़ या घटनेमुळे तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते़
धुळ्यानजिक सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोराणे शिवारात खैरनार पेट्रोल पंपाच्या बाजुला बसराज खिवसरा राठोड यांचे तन्वी नामक हॉटेल आहे़ या ठिकाणी रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निशांत उर्फ आप्पा श्यामराव विधाते (रा़ यशवंत नगर, साक्री रोड, धुळे), सनी जोसेफ टोल (रा़ मिशन कंपाऊंड, साक्री रोड, धुळे) आणि त्यांच्या सोबत एक जण असे तीन जण आले. त्यांनी बसराज यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले़ ते देण्यास नकार दिल्याने एकाने राठोड यांच्यावर कुºहाडीने वार केला. त्यात राठोड जबर जखमी झाले. हा थरार रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडला़ या घटनेनंतर लागलीच राठोड यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत़
याप्रकरणी जखमी बसराज यांचा मुलगा योगेश बसराज राठोड (३२, रा़ गोजराबाई भामरे सोसायटी, आसाराम बापुच्या शाळेजवळ, जुना टोल नाका, सुरत बायपास रोड, धुळे) यांनी सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, वरील तिघांविरुध्द संशयावरुन भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जी़ ए़ गोटे घटनेचा तपास करीत आहेत़