धुळे शहरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही; याची खबरदारी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:33 PM2018-02-09T21:33:01+5:302018-02-09T21:34:21+5:30
भारिप बहुजन महासंघातर्फे मनपा आयुक्तांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा प्रशासनाच्या पथकाने आग्रारोड, बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढल्यामुळे येथील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे शहरात काही प्रमाणात अपघाताचे प्रमाणाही घटले आहे. यापुढे येथील परिसरात अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी शुक्रवारी सकाळी भारिप बहुजन महासंघातर्फे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे योगेश जगताप, योगेश बेडसे, नीलेश अहिरे, मिलिंद वाघ, इक्बाल तेली, शंकर खरात, सागर मोहिते, आकाश बागुल व अन्य पदाधिकारी आदी उपस्थित होते.