तोट्या नसलेल्या नळांची तपासणी सुरू
By admin | Published: June 2, 2015 04:40 PM2015-06-02T16:40:02+5:302015-06-02T16:40:02+5:30
शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अशा नळांचे सर्वेक्षण करून संबंधित नळधारकाकडून दंडवसुली केली जाणार
धुळे : शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरवठय़ाच्या वेळेत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे अशा नळांचे सर्वेक्षण करून संबंधित नळधारकाकडून दंडवसुली केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात अवैध नळकनेक्शन धारकांवर कारवाई सुरू असतांनाच आता तोट्या नसलेले नळही शोधून काढले जाणार आहेत. तर वॉटर मीटर बसविण्याबाबतही लवकरच विचार केला जाणार आहे. १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून नळांना वॉटर मीटर बसविण्यात येणार असून त्याअनुषंगाने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तोट्या नसलेल्या नळांना नागरिकांनी त्वरित तोट्या बसवाव्यात व कारवाई टाळावी तसेच पाण्याचा अपव्यय रोखावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.