धुळ्यात मोटरसायकल रॅलीतून अहिंसा, शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:31 PM2018-03-28T17:31:18+5:302018-03-28T17:31:18+5:30

महावीर जयंती : श्री सकल जैन समाज व नवकार मंडळातर्फे विविध कार्यक्रम

Nonviolence, peace message from a motorcycle rally in Dhule | धुळ्यात मोटरसायकल रॅलीतून अहिंसा, शांतीचा संदेश

धुळ्यात मोटरसायकल रॅलीतून अहिंसा, शांतीचा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवारी, २९ रोजी महावीर भगवान जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने दुधेडिया हायस्कूल येथे सकाळी सात वाजता ध्वजवंदन, प्रार्थना होणार आहे.सकाळी नऊ वाजता जैन मंदिरपासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, कलश स्पर्धा व इतर उपक्रम घेण्यात येतील. यानंतर जैन समाजासाठी नवकारशीचा कार्यक्रम दुधेडिया हायस्कूल येथे होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र सिसोदीया, दिलीप कुचेरिया, डॉ. आनंद ताथेड, उज्ज्वल दुग्गड, प्रवीण कुचेरिया, महेश बाफना, अजित चोरडिया, विशाल ढोलीया, विशाल मल्हारा करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०१८ निमित्ताने बुधवारी सकाळी श्री सकल जैन संघ, नवकार मंडळातर्फे अहिंसा चौकातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत सहभागी जैन समाजबांधवांनी अहिंसा व शांतीचा संदेश दिला. रॅलीत शहरातील हजारो जैन समाजबांधव सहभागी झाले होते. 
शहरातील अहिंसा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे ही रॅली पारोळारोड, ८० फुटी रस्ता, मालेगावरोड, अग्रसेन चौक, चाळीसगावरोडमार्गे जुना आग्रारोड, महात्मा गांधी पुतळा, दत्त मंदिर चौकमार्गे जयहिंद कॉलनी परिसर, गल्ली दोन नंबर २ येथील जैन मंदिरापर्यंत आली. त्यानंतर ही रॅली साक्रीरोडवरील जैन मंदिरापर्यंत आली. तेथे रॅलीचा समारोप झाला. 
भरगच्च कार्यक्रम 
यानिमित्ताने  बसस्थानक, मार्केट यार्ड, खंडेराव बाजार येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी रेल्वे स्टेशनरोडवरील हिरे भवनात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘लूक अ‍ॅन लर्न’ च्या वतीने नाटीका, नृत्य व एकांकीका सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा, मुन्नाभाऊ घी वाले, अ‍ॅड. राजेश मुणोत, अध्यक्ष संतोष पाटणी, पवन पाटणी, राजेंद्र सिसोदीया, दिलीप कुचेरिया, रवींद्र पाटणी, कमलेश गांधी, राजू बाफना, अ‍ॅड. आनंद ताथेड, विजय दुग्गड, उज्ज्वल दुग्गड, राजेंद्र बंब, सुनील खिलोसीया, किशोर शहा, दिलीप पारख, विशाल मल्हारा, दिनेश भंडारी, राहुल साभद्रा यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Nonviolence, peace message from a motorcycle rally in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.